सावंतवाडीत बंद फ्लॅटमध्ये चोरी

सावंतवाडीत बंद फ्लॅटमध्ये चोरी

Published on

14850
सावंतवाडी ः घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस अधिकारी.

सावंतवाडीत बंद फ्लॅटमध्ये चोरी

चांदीची भांडी पळविली; पोलिसांकडून पंचनामा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः येथील सालईवाडा भागात राहणाऱ्या निवृत्त एसटी कर्मचारी सुधीर भोगटे यांच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली. यात घरात असलेली चांदीची भांडी अज्ञाताने चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (ता. ७) उघड झाला. दरम्यान, मुंबईत राहत असलेले भोगटे हे आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशी, सावंतवाडी येथे फ्लॅट असलेले भोगटे हे मुंबईत राहतात. सावंतवाडीत ते कधी कधी येतात. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार काल उघड झाला; मात्र भोगटे हे मुंबईत असल्यामुळे माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी त्यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. आज ते येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार घरातील कपाटात ठेवलेली चांदीची भांडी चोरट्याने नेली; मात्र बाजूला असलेली पितळेची भांडी त्याच ठिकाणी ठेवून चोरटा पसार झाला. घरात काही मौल्यवान वस्तू किंवा रोकड नसल्यामुळे अन्य काही चोरीला गेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.