गोव्यात खैर तोडप्रकरणी 
तळवडेतील एकास कोठडी

गोव्यात खैर तोडप्रकरणी तळवडेतील एकास कोठडी

गोव्यात खैर तोडप्रकरणी
तळवडेतील एकास कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः खैराची झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याप्रकरणी तळवडे येथील एकाला सांगे-दक्षिण गोवा येथे अटक करण्यात आली. सिकंदर चंद्रकांत मालवणकर (वय ४५) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याला सांगे येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबतची माहिती अशी, की सांगे येथील वन विभागाच्या पथकाला बेकायदेशीर खैर तोडीची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित मालवणकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० झाडांसह झाडे कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सांगे वनक्षेत्रपाल विक्रमादित्य गावकर अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com