नारिंग्रेत कृषीदिनानिमित्त वृक्षारोपण

नारिंग्रेत कृषीदिनानिमित्त वृक्षारोपण

Published on

14885
नारिंग्रे ः येथे वृक्षारोपण करण्यात आले.

नारिंग्रेत कृषीदिनानिमित्त वृक्षारोपण

ग्रामपंचायतीचा उपक्रम; शेतकऱ्यांचा सन्मानपत्राने गौरव

देवगड, ता. ८ ः नारिंग्रे येथे येथील पंचायत समिती कृषी विभाग, तालुका कृषी विभाग तसेच नारिंग्रे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो. यावेळी कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती सुनील तथा भाई पारकर, रामेश्‍वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राचे उद्यानविद्यावेत्ता विजय दामोदर, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, विस्तार अधिकारी (कृषी) श्री. मदने, विस्तार अधिकार (ग्रामपंचायत) नीलेश जगताप, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, नारिंग्रे सरपंच महेश राणे, उपसरपंच महेश जंगले, मंडळ कृषी अधिकारी श्री. उल्पे, मंडळ कृषी अधिकारी श्री. भोसले, कृषी पर्यवेक्षक हिंदळे ए. पी. आपटे, ''आत्मा''चे निकेतन राणे, सोसायटीचे अध्यक्ष सुनील बापट, प्रसाद परब, ग्रामसेविका श्रद्धा आळवे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा प्रारंभ सरपंच महेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाला. यावेळी श्री. दामोदर यांनी आंबा, काजू व भात पीक संरक्षण व खत नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. कैलास ढेपे यांनी राज्य शासन कृषी विभागाच्या विविध योजना, तर दिंगबर खराडे यांनी जिल्हा परिषदेकडील विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्री. उल्पे, निकेतन राणे, प्रसाद परब आदींनी कृषी विषयक मार्गदर्शन केले. कृषीमध्ये नावीन्यपूर्ण कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. दिगंबर खराडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.