संक्षिप्त

संक्षिप्त
Published on

फोटो ओळी
-rat10p11.jpg ः 3M15173 साखरपा ः अभियानाचा फलक.

‘एक सही संतापाची’ला
साखरप्यात प्रतिसाद
साखरपा, ता. १० ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव साखरपा येथे एक सही संतापाची मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात सत्तेचा खेळ सुरू आहे. मतदारांनी मतदान करायचे आणि निवडून आल्यावर सत्तेचा सारीपाट खेळायचा. मतदारांना कोणी विचारात घ्यायचे नाही, या साऱ्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सही संतापाची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संगमेश्वर तालुकाध्यक्ष सिद्धेश केळसकर, उपतालुकाध्यक्ष विलास उर्फ बंड्या सुर्वे, अविनाश सावंत, अमोल मांडवकर, उदय सावंत, अक्षय सक्रे, कौस्तुभ केतकर आदी पदाधिकारी व सह्या करण्यासाठी नागरिक उपस्थित होते
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.