काजू प्रक्रिया धारकांची कर्जे पूनर्गठीत करा

काजू प्रक्रिया धारकांची कर्जे पूनर्गठीत करा

Published on

काजू प्रक्रियाधारकांची कर्जे पूनर्गठीत करा

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे मागणी ; प्रमोद जठार यांनी घेतली भेट

रत्नागिरी, ता. १० ः कोकणातील काजू प्रक्रियाधारकांना कर्जा फेडण्यासाठी मुदतवाढ मिळावी किंवा कर्जे १० वर्षांकरिता पूनर्गठीत करून मिळावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. काजू बागायतदारांची आजची परिस्थिती त्यांनी मंत्री कराड यांच्यापुढे मांडली. तसेच लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रियाधारकांनी २०१८ मध्ये काजू बी १८० रुपये दराने खरेदी केली होती. परंतु परदेशातून आयात केलेल्या काजुचा दर ११० रुपये होता. त्यामुळे कारखानदारांचे फार मोठे नुकसान झाले. परिणामी घेतलेले कर्ज परतावा करता येत नसल्याने काही प्रकरणे एनपीएत गेली आहेत. त्यामुळे या सर्व कारखानदारांची कर्जे १० वर्षांकरिता पुनर्गठीत करून मिळाल्यास सर्वांना हप्ते भरणे सोयीचे होईल. कर्जाची परतफेडही होईल, अशा मागणीचे पत्र जठार आणि काजू प्रक्रियाधारक संघातर्फे डॉ. कराड यांना दिले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री दापोली येथे मंत्री दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेतली होती. ते सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंडणगड येथील मंडणगड आणि कुंबळे येथील कनिष्ठ महाविद्यालयांतील कार्यक्रमाला उपस्थित होते. दोन्ही महाविद्यालयांना पद्मश्री कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते यांचे नाव देण्यात आले आहे.

उद्यागाचे प्रश्‍न
दोन्ही जिल्ह्यात काजूचे चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतले जाते. सुमारे एक लाखाहून अधिक हेक्टरवर काजूची लागवड झालेली आहे. यामधून मोठ्याप्रमाणात उत्पादन घेतले जाते. परकीय चलन मिळत असल्याने गेल्या काही वर्षात तरुण वर्गही काजू प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहे. यंदा काजू बी मुबलक होती, पण ती दर्जेदार नव्हती. त्यामुळे दर मिळाला नाही. तसेच प्रक्रियाधारकांना एक नंबरची काजू बी योग्य प्रमाणात उपलब्ध झाली नाही. चांगला दर देणारा माल कमी राहिल्याने त्याचा परिणाम वार्षिक उलाढालीवर झाला आहे. मागील तीन वर्षात आलेल्या अडचणीना सामोरे जाण्यासाठी काजू बागायतदार धडपडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.