राजापूर-दांडे-अणसुरे पुलाचे काम अर्धवट, 36 किमीचा वळसा

राजापूर-दांडे-अणसुरे पुलाचे काम अर्धवट, 36 किमीचा वळसा

rat१०२३.txt

बातमी क्र.२३ (टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
-rat१०p२२.jpg- KOP२३M१५२०९ राजापूर ः दांडे-अणसुरे पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता बंद असल्याचा लावलेला फलक.
-rat१०p२३.jpg-२३M१५२१० राजापूर ः दांडे-अणसुरे पुलाचे सुरू असलेले काम.

दांडे-अणसुरे पुलाचे काम अर्धवट, ३६ किमीचा वळसा
विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय ; भाजपाचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
राजापूर, ता. १० ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या दांडे अणसुरे पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहनचालकांना ३६ किमीचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी आणि पर्यटकांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. या पुलाच्या दोन्ही खांबाचे काम सुरू झाल्यानंतर थांबले आहे. याबाबत भाजपाने आवाज उठवला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून या पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील दांडे-अणसुरे येथील सागरी पूल वाहतुकीस नादुरुस्त झाल्याने मार्च २०२३ मध्ये तोडण्यात आला. पूल तोडल्यामुळे सिंधुदुर्गमधून रत्नागिरीमध्ये तसेच रत्नागिरीतून सिंधुदुर्गमध्ये जाण्या-येण्यासाठी ३६
किमीचा कच्च्या रस्त्यावरून वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. या कामाला गती मिळावी, अशी मागणी सागवे भाजपाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com