रत्नागिरी-एक सही संतापाची'' मोहिम

रत्नागिरी-एक सही संतापाची'' मोहिम

Published on

मनसेकडून रत्नागिरीत
''एक सही संतापाची'' मोहिम
रत्नागिरी ः राजकीय स्थिती, राजकारण्यांची मतदारांना गृहीत धरुन राजकीय स्वार्थासाठी अभद्र युती करण्याची वृत्ती याविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी संपूर्ण राज्याप्रमाणेच रत्नागिरी शहरातही '' एक सही संतापाची'' या मोहिमेचे आयोजन माळनाका व मांडवी समुद्र किनारा याठिकाणी शहर मनसे तर्फे करण्यात आले. रत्नागिरीतील तमाम नागरिकांनी यात सहभागी होत स्वाक्षरी नोंदवत आपला रोष व प्रतिक्रिया व्यक्त केल्या काही नागरिकांनी तर ''राज ठाकरे आता एकमेव पर्याय आहेत'' अशा भावना याठिकाणी व्यक्त केल्या आहेत. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, मनसे परिवहन सेना राज्य उपाध्यक्ष सुनिल साळवी, शहर संघटक अमोल श्रीनाथ आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.