शिरगाव हायस्कूलला बायोमॅट्रिक मशिन

शिरगाव हायस्कूलला बायोमॅट्रिक मशिन

Published on

15254
शिरगाव ः हायस्कूलला दिलेली बायोमॅट्रिक मशिन.

शिरगाव हायस्कूलला बायोमॅट्रिक मशिन
देवगड ः तालुक्यातील शिरगाव हायस्कूलला बायोमॅट्रिक मशिन देणगी स्वरुपात प्राप्त झाली आहे. दीपलक्ष्मी शंकर साटम (मुंबई) यांनी ही मशिन उपलब्ध करून दिली. शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी, बारावी विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यासाठी दोन बायोमॅट्रिक्स मशिनची आवश्यकता होती. त्यापैकी एक मशिन १९८६-८७ च्या दहावीच्या बॅचकडून याआधी प्राप्त झाली होती. आवश्यक असणारे दुसरी मशिन दीपलक्ष्मी साटम यांच्याकडून देणगी स्वरुपात प्रात झाली. याची किंमत सुमारे १६ हजार ५०० रुपये इतकी आहे. या देणगीबद्दल शाळेच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
...................
शिरगाव हायस्कूलला पुस्तक संच
देवगड ः शिरगाव (ता.देवगड) हायस्कूलला सुमारे पाच हजार रुपये किंमतीची पुस्तके देणगी स्वरुपात प्राप्त झाली. विदुला जोशी यांच्या माध्यमातून युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशन संस्था यांनी एकत्र येऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ‘जागर समकालीन वाचनाचा’ ही चळवळ उभी केली आहे. या चळवळीने प्रकाशित केलेली पुस्तके प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयामध्ये असायला हवीत, हा या चळवळीचा प्रमुख उद्देश आहे. त्यानुसार शिरगाव हायस्कूलला या प्रेरणादायी पुस्तकांचा संच देणगी स्वरुपात देण्यात आला. त्याबद्दल शाळेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.