रत्नागिरी- स्वरूपानंद पतसंस्था पार करणार 275 कोटींचा टप्पा

रत्नागिरी- स्वरूपानंद पतसंस्था पार करणार 275 कोटींचा टप्पा

स्वरूपानंद पतसंस्था ओलांडणार
२७५ कोटींच्या ठेवीचा टप्पा
ॲड. दीपक पटवर्धन ; ठेववृद्धी मासात गुंतवणूक करण्याच आवाहन

रत्नागिरी, ता. १० : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासामध्ये पहिल्या १९ दिवसांत ९ कोटी रुपये ठेवी जमा झाल्या. आहेत. २७२ कोटींची वेस ओलांडत या ठेववृद्धी मासात समाप्ती होण्यापूर्वी २७५ कोटी ठेवींचा टप्पा स्वरूपानंद पार करेल, असा विश्वास व्यक्त करताना ठेवीदारांनी स्वरूपानंद पतसंस्थेच्या विविध ठेव योजनेत मोठी गुंतवणूक करावी, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
स्वरूपानंद पतसंस्थेच्या ३३ वर्षाच्या वाटचालीचा अभ्यास केला तर स्वामी स्वरूपानंदच्या प्रतिवर्षीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कमालीचे सातत्य व प्रमाणबद्धता आहे, असे त्यांनी सांगितले.
अॅड. पटवर्धन यांनी सांगितले की, पतसंस्थेने आयकर मर्यादेच्या बाहेर जाऊन रोख व्यवहार केले नाही. अगर आयकर मर्यादेचे बाहेर जात कधीच रोखीने पैसे दिले नाहीत. पॅनकार्ड, आधार कार्डसकट सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जाणीवपूर्वक पूर्ण केली. या पतसंस्थेचा निव्वळ नफाही सातत्याने वाढता राहिला. गेली १० वर्ष १ कोटी पेक्षा जास्त नफा कमवताना कोठेही नफाखोरी न करता निधी व्यवस्थापन आणि निधीचा पूर्णांशाने उपयोग केला. वसुली जवळपास पूर्णांशाने केल्याने संस्थेला चांगला लाभ होत राहिला. झालेल्या नफ्यातून ५० टक्क्यांच्या आसपास रक्कम स्वनिधी म्हणून एकत्र करत स्वनिधी वाढवत नेऊन संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होत गेली.
---------
चौकट १
पतसंस्थेचे टीमवर्क

आर्थिक व्यवहारांना शिस्तीचे कोंदण महत्त्वाचे असते, ते स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या प्रत्येकाने कसोशीने पाळले. विश्वासार्हता ही सामूहिक असावी लागते. पतसंस्थेचा प्रत्येक घटक विश्वासार्हतेला सातत्याने जपत आला. उत्तम ग्राहक सेवा, नव तंत्रज्ञानाचा उपयोग करत पतसंस्थेची स्वच्छ प्रतिमा दिवसेंदिवस अधिक चमकत गेली. एक उत्तम टीमवर्क करत स्वरूपानंद पतसंस्थेने स्वतंत्र ओळख करून दिल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com