संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

फोटो ओळी
-ratchl103.jpg ःM15230 चिपळूण ः प्रा. नेहा विचारे यांचा सत्कार करताना आमदार शेखर निकम.


प्रा. नेहा विचारे यांचे सेट परीक्षेत यश
चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचघरी सती महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाच्या प्राध्यापिका नेहा विचारे यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (सेट) पदार्थ विज्ञान या विषयात यश मिळवले आहे. गेली चार वर्षे त्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत एमएससीबीएड् शिक्षण पूर्ण करून करून शासनाची टीएआयटी उत्तीर्ण झाल्या आहेत. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने या परीक्षेस विशेष महत्व आहे. आमदार निकम यांच्या हस्ते एका कार्यक्रमात प्राध्यापिका विचारे यांचा गौरव करण्यात आला. या वेळी माजी सभापती पूजा निकम, संचालक शांताराम खानविलकर, सेक्रेटरी महेश महाडिक, संचालक चंद्रकांत सुर्वे, शशिकांत नलावडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.


फोटो ओळी
-rat10p26.jpg ः 15226 खेड ः प्रज्ञेश दोडेकर याचा सत्कार करताना शिक्षक.


प्रज्ञेश दोडेकरची नवोदयसाठी निवड
खेड ः तालुक्यातील तळे विद्यालयातील प्रज्ञेश दोडेकर याची जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी निवड झाली आहे. त्याने पाचवीला असताना नवोदयची परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्याने यश संपादन केले आहे. त्याबद्दल त्याचे मार्गदर्शक शिक्षक व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद जंगम, विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपटराव जगताप, ज्येष्ठ शिक्षक प्रवीण खरात, प्रशांत पंदेरे, महेश राणे, लक्ष्मण तांबडे, प्रशांत नाकती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

-rat10p27.jpg ः 3M15227 खेड ः नेहा पालांडे यांना शिवसेना महिला आघाडी उप संघटक पदी नियुक्तीचे पत्र देताना आमदार योगेश कदम.


नेहा पालांडेंची उपसंघटकपदी निवड
खेड ः तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी उपसंघटकपदी नेहा पालांडे यांची निवड झाली असून, त्यांना नुकतेच शिवसेना प्रवक्ते आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, सुषमा कदम, भास्कर पालांडे आदी उपस्थित होते.


फोटो ओळी
-rat10p28.jpg ः15228 खेड ः सुनील तटकरे यांना शिवसेना उपविभागप्रमुखपदी निवडीचे पत्र देताना आमदार कदम.

सुनील तटकरे यांची
उपविभागप्रमुखपदी निवड
खेड ः तालुक्यातील फुरूस गणाच्या शिवसेना उपविभागप्रमुखपदी पोयनार येथील कार्यकर्ते सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच निवडपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अरूण कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, राजेंद्र शेलार, महेंद्र भोसले, रामचंद्र ऐनकर , स्वप्नील महाडिक आदी उपस्थित होते.


फोटो ओळी
-rat10p29.jpg ः M15229 खेड ः तालुक्यातील होडखाडचे माजी सरपंच रामचंद्र गोरीवले यांचे व सहकाऱ्यांचे स्वागत करताना शिवसेना नेते रामदास कदम.

होडखाडचे माजी सरपंचांसह ग्रामस्थ शिवसेनेत
खेड ः तालुक्यातील होडखाडचे माजी सरपंच रामचंद्र गोरिवले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शाखाप्रमुख बबन दिवाळे, रामचंद्र गोरिवले, रघुनाथ गोरिवले, कमलाकर गोरिवले, बिपिन शिगवण, रघुनाथ भुवड, संजय शिगवण व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करताना होडखाड, पन्हाळजे व लगतच्या पंचक्रोशीत आपण बाळासाहेबांचे विचार अधिक भक्कम करण्याचा व त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार करत असल्याचे सांगितले. होडखाड व पंचक्रोशीच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून, तुमच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे कदम यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.