रत्नागिरी- बचाव विधी सहाय्यकांनी केली उत्तम कामगिरी

रत्नागिरी- बचाव विधी सहाय्यकांनी केली उत्तम कामगिरी

Published on

\
-rat१०p१९.jpg ःM१५१९९ रत्नागिरी ः रत्नागिरीतील जिल्हा न्यायालयातील लोक अभिरक्षक कार्यालय.
-----------
बचाव विधी सहाय्यकांनी केली उत्तम कामगिरी

लोकाभिरक्षक कार्यालय ;आरोपीला स्वतःचा बचाव करण्याचा हक्क

रत्नागिरी, ता. १० ः आरोपीला स्वतःचा बचाव करण्याचा हक्क असून, त्यासाठी त्याला दर्जेदार विधीसेवा मिळण्याचा हक्क असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने लोकाभिरक्षक कार्यालय स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रत्नागिरीतदेखील जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. यापैकी बचाव विधी सहाय्यकांनी उत्तम कामगिरी केली.
या कार्यालयामार्फत मुख्य न्यायदंडधिकारी, प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी यांचेकडील रिमांडची कामे लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत नेमलेले बचाव सहाय्यक सल्लागार पाहतात. भादंवि कलम ३७९ या कलमाअंतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी १८ वर्षाच्या मुलाला मिरज येथे अटक केली. लोकाभिरक्षक कार्यालयाकडून आरोपीच्यावतीने ॲड. आयुधा अक्षय देसाई यांनी भक्कमपणे बाजू मांडली. ॲड. देसाई यांनी आरोपीचा बचाव करण्याचा टोकाचा प्रयत्न केला व आरोपीस जामीन मिळवून दिला. त्यांच्या या प्रयत्नाची दखल घेतली गेली आहे. या व अशा प्रकरणामध्ये ॲड. यतीन धुरत व ॲड. पल्लवी धोत्रे यांनी सहकार्य करतात.
-----
चौकट...
लोकाभिरक्षक कार्यालयाची स्थापना
आरोपीलादेखील स्वतःचा बचाव करण्यासाठी अधिकार आहे. त्यासाठी योग्य कायदेशीर सेवा मिळण्याचा हक्क आहे. ही भूमिका न्यायव्यवस्थेने जोपासली आहे. ज्या आरोपींना स्वतःचा बचाव करण्यासाठी खासगी वकील नेमणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी विधी सेवेकडून मोफत विधी सेवा पुरवली जात होती; परंतु आता त्यासाठी स्वतंत्रपणे लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकाभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य विधी सहाय्यक म्हणून ॲड. अजित वायकूळ काम पाहतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.