बिडवाडी येथील विद्यार्थ्यांनी 
अनुभवली बांधावरची शाळा

बिडवाडी येथील विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा

Published on

15290
बिडवाडी : येथील अनिल परुळेकर यांच्या शेतामध्ये आज बिडवाडी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘बांधावरची शाळा’ अनुभवली.


बिडवाडी येथील विद्यार्थ्यांनी
अनुभवली बांधावरची शाळा

कणकवली, ता.१० : जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्‍याने सध्या शेती कामांना वेग आला आहे. यात बिडवाडी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतात उतरून भात लावणीचा अनुभव घेतला.
अलीकडच्या काळात शेती कमी होत चालली आहे. त्‍यामुळे पुढील पिढी शेतीपासून दुरावते की काय? असा प्रश्‍न आहे. त्‍यामुळे विद्यार्थी दशेतच मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी. शेतकऱ्यांचे कष्‍ट समजावेत यासाठी ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम आज राबविल्‍याची माहिती बिडवाडी माध्यमिक विद्यालय संस्थेचे प्राचार्य सुमुख जोशी यांनी दिली. बिडवाडीतील प्रगतीशील शेतकरी अनिल परुळेकर यांच्या शेतामध्ये हा उपक्रम झाला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी मुलांना भात शेतीविषयीची संपूर्ण माहिती समजावून सांगितली. भातशेती करताना कोणकोणती कामे केली जातात? नांगरणी, पेरणी, बेनणी, कापणी, उफाळणी व झोडपणी या सर्व कामांविषयी सविस्तर माहिती दिली. शेतीचे औजारे कशी हाताळावी, औजारांची प्रत्यक्ष ओळख करून त्यांचे वापर समजावून सांगितले. तसेच अन्नाचे महत्त्व आणि त्यामागची मेहनत विद्यार्थ्यांना पटवून दिली. यावेळी प्रशालेचे शिक्षक ए.के. कांबळे, एस.डी. रासम, टी. ए. कुबल, ए. एस. सावंत, एस. एस. तांबे, लिपिक जी. पी. लाड, शिक्षकेत्तर कर्मचारी आर. बी. पाटणकर, एम.डी. झळके, डी. आर. गोसावी विद्यार्थ्यांसोबत शेतात उतरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.