सेवानिवृत्त शिक्षकांमधून तात्पुरते शिक्षक नियुक्ती

सेवानिवृत्त शिक्षकांमधून तात्पुरते शिक्षक नियुक्ती

Published on

सेवानिवृत्त शिक्षकांमधून तात्पुरते शिक्षक नियुक्ती

शासनाने आदेश ; महिन्याला २० हजार रुपये मानधन

रत्नागिरी, ता. १० ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या जागांवर पवित्र प्रणालीमार्फेत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. त्यांना २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व शाळा जून महिन्यात सुरु झाल्या आहेत. पण जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे खालील तरतूदींप्रमाणे भरण्यात यावीत असे सांगण्यात आले आहे. त्या कंत्राटी तात्पुरत्या शिक्षक नियुक्तीसाठी त्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील. जिल्हा परिषदेतर्फे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत. संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी. नियुक्त्या १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात याव्यात. या बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. या प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त (शिक्षण) यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात असा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.