निवृत्त शिक्षकांना कंत्राटी नियुक्त्या

निवृत्त शिक्षकांना कंत्राटी नियुक्त्या

11008

निवृत्त शिक्षकांना कंत्राटी नियुक्त्या

दीपक केसरकर; रिक्त पदांसाठी तात्पुरती व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः शिक्षक भरतीला विलंब होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त पदांवर निवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या नियुक्त्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना त्याबाबतचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नियोजन समिती सभेत दिली.
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य व अनुदानित शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या असून जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदलीमुळे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहेत. जिल्ह्यात १ हजार हुन अधिक पदे रिक्त आहेत. शिक्षक नसल्याने होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त शिक्षक पदे अटी शर्तीला अनुसरून भरावित, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी यावेळी दिली. शासन आदेशनुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असून जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांकडून १४ जुलै २०२३ पर्यंत अर्ज मागविले आहेत, अशी माहिती यावेळी शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
--------
चौकट
या आहेत अटी
कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकाची वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा ७० वर्षे असेल. कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त प्रतिमहा २० हजार मानधन दिले जाईल. शासनाने विहित केलेल्या अटी शर्ती मान्य असल्याबाबत हमीपत्र घेतले जाईल. नियुक्त शिक्षक हा नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल.
--------
कोट
कंत्राटी तत्त्वावर काम करण्यास इच्छुक निवृत्त शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत १४ जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. प्रशासनाच्यावतीने तसे आवाहन केले आहे.
- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com