जिल्ह्यात लवकरच ''इंटरनॅशनल स्कूल''

जिल्ह्यात लवकरच ''इंटरनॅशनल स्कूल''

Published on

15323
आंबोली ः येथील शाळेत माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर.

जिल्ह्यात लवकरच ‘इंटरनॅशनल स्कूल’

दीपक केसरकर; आंबोली-गेळेसह दोडामार्ग, वेंगुर्लेला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल हे ५०० विद्यार्थी पटसंख्या असलेले स्कूल सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. आंबोली-गेळेसह दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यांत ते उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आज आंबोली व गेळे येथे जमीन पाहणी करण्यात आली असून या शाळेत विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली.
आंबोली आणि गेळे बाळभाट या शाळांमध्ये शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री केसरकर यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, शशिकांत गावडे, वामन पालेकर, रामा गावडे, विजय राऊत, विष्णू चव्हाण आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके, शूज वाटप करण्यात येणार आहेत. तसेच ५० हजार शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षक भरती केले जाणार आहेत; मात्र न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवल्यानंतर ही प्रक्रिया होईल. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात शिक्षणसेवक भरती करावी, असे सुचित केले आहे. विद्यार्थ्यांना मोफत सुविधा निर्माण करून देताना शिक्षकांसाठीही कटिबद्ध आहोत.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘या पाचशे विद्यार्थ्यांच्या इंटरनॅशनल स्कूलला मंजुरी मिळाली आहे. आंबोली-गेळे येथे दोनशे, तर सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यांत प्रत्येकी शंभर विद्यार्थी संख्या असणारे नेताजी स्कूल उभारले जाणार आहे. एकाच ठिकाणी पाचशे विद्यार्थी पटसंख्या उपलब्ध होणार नसल्याने मतदारसंघातील विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा निर्णय घेतला जाईल. नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल ऑफ इंटरनॅशनलमध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांना आणि सर्वांगीण विकासाला संधी उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी आंबोली आणि गेळे येथे जमीन पाहणी केली आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.