बालवैज्ञानिक प्रशिक्षणात शिरगांव
हायस्कूलचे 12 विद्यार्थी उत्तीर्ण

बालवैज्ञानिक प्रशिक्षणात शिरगांव हायस्कूलचे 12 विद्यार्थी उत्तीर्ण

Published on

बालवैज्ञानिक प्रशिक्षणात शिरगांव
हायस्कूलचे १२ विद्यार्थी उत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः शिरगांव (ता.देवगड) हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १२ विद्यार्थी बालवैज्ञानिक प्रशिक्षण पात्रता फेरीत उत्तीर्ण झाले आहेत.
शाळास्तरावर बाल वैज्ञानिक निर्माण व्हावेत म्हणून पुणे येथील ज्ञान प्रबोधनी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी राज्यातून ५० विद्यार्थी निवडले जातात. ही निवड प्रक्रिया चार टप्प्यात पार पडते. त्यातील पहिल्या पात्रता फेरीत शिरगाव हायस्कूलमधील १२ विद्यार्थी पात्र झाले आहेत. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दोन महिने ऑनलाईन, एकूण सात व्याख्याने व एक महिना पुणे येथे पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण याचा समावेश आहे. यामध्ये निवड होणारे विद्यार्थी अंतिम प्रशिक्षणास निवडले जातील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. निवड झालेले विद्यार्थी असे ः वायू शिंदे, निधीश कदम, माही सुधीर साटम, प्रथमेश सचिन चव्हाण, भुवनेश तावडे, ऋतुजा पवार (सर्व दहावी), ईशानी चव्हाण, अर्पिता ओटवकर, सई राजेंद्र चव्हाण, आर्या जाधव, शुभम लक्ष्मण खरात, स्वराली सागर मेने (सर्व इयत्ता नववी).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.