कुडाळ, मालवणातील पर्यटनाबाबत 
नीलेश राणेंची पर्यटनमंत्र्यांशी चर्चा

कुडाळ, मालवणातील पर्यटनाबाबत नीलेश राणेंची पर्यटनमंत्र्यांशी चर्चा

Published on

15281
मुंबई ः राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करताना नीलेश राणे.

कुडाळ, मालवणातील पर्यटनाबाबत
नीलेश राणेंची पर्यटनमंत्र्यांशी चर्चा
कुडाळ, ता. १० ः भाजपा नेते नीलेश राणे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुंबई येथे भेट घेऊन किल्ले सिंधुदुर्ग, धामापूर भगवती मंदिर परिसर, चिंदर तलाव, डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकास संदर्भात सकारात्मक चर्चा केली.
काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील १० प्रमुख धार्मिक स्थळांच्या विकासासाठी पर्यटनमंत्री लोढा यांच्या अंतर्गत असलेल्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर आता मालवण तालुक्यात किल्ले सिंधुदुर्ग येथे पायाभूत सुविधा विकास करणे, चिंदर तलाव सुशोभीकरण, धामापूर श्री देवी भगवती मंदिर परिसर विकास तसेच तलाव सुशोभीकरण, कुडाळमध्ये डिगस-चोरगेवाडी धरण येथे उद्यान विकसित करणे व पायाभूत सुविधा निर्माण करणे या विकासकामांसाठी निधीचा प्रस्ताव नीलेश राणे यांनी पर्यटनमंत्री लोढा यांना सादर केला. या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना मंत्री लोढा यांनी दिल्या. किल्ले सिंधुदुर्ग येथे पायाभूत सुविधा विकास व अन्य सुविधांसाठी राणे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली असून चिंदर तलाव सुशोभीकरणास ६ कोटी, तर धामापूर भगवती मंदिर परिसर व तलाव सुशोभीकरण तसेच डिगस-चोरगेवाडी धरण परिसर विकासासाठी प्रत्येकी ३ कोटी एवढ्या निधीची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.