''महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स''च्या उपाध्यक्षपदी डॉ. दीपक परब

''महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स''च्या उपाध्यक्षपदी डॉ. दीपक परब

Published on

swt113.jpg
M15397
इचलकरंजीः डॉ. दीपक परब यांना शुभेच्छा देताना मान्यवर.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या
उपाध्यक्षपदी डॉ. दीपक परब
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या उपाध्यक्षपदी (कोकण विभाग) मसुरे-चांदेर गावचे सुपुत्र प्रसिध्द उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड इचलकरंजी येथे झालेल्या सभेत करण्यात आली. या निवडीबद्दल डॉ. परब यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ. परब हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. या संस्थेला विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी डॉ. परब यांनी प्रयत्न केले. विविध संस्थांच्या अध्यक्षपदी असून शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. याची दखल घेऊन त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कल्लाप्पा आण्णा जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते डॉ. परब यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, जव्हार इंडस्ट्रीज संचालक रोहित आवडे, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, तनसुख झांबड, कांतिलाल चोपडा, नितीन बंग, भालचंद्र राऊत, मनोज वालावलकर, महाराष्ट्र चेंबर कॉमर्सचे नूतन सदस्य दत्तप्रसाद पेडणेकर, सीमा शहा आदी उपस्थित होते. संस्थेला गर्व वाटेल असे काम करण्याचा मानस यावेळी डॉ. परब यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.