देवगडात नवनिर्मित क्रीडांगणाचे नामकरण

देवगडात नवनिर्मित क्रीडांगणाचे नामकरण

Published on

swt115.jpg
M15399
वाडाः येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडांगण नामकरण झाले.

देवगडात नवनिर्मित क्रीडांगणाचे नामकरण
फलकाचे अनावरणः केळकर हायस्कूलमध्ये रंगला सोहळा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ः देवगड एज्युकेशन बोर्ड संचलित वाडा येथील अ. कृ. केळकर हायस्कूलमध्ये क्रीडांगण नामकरण कार्यक्रम झाला. प्रशालेच्या नवनिर्मित क्रीडांगणाचे ‘नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित क्रीडांगण’ असे नामकरण करण्यात आले. नामकरणाचे फलकाचे अनावरण अनंत करंदीकर (हुर्शी) यांच्या हस्ते करण्यात आले.
देवगड एज्युकेशन बोर्डाचे सहकार्यवाह निरंजन दीक्षित यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुमारे सात लाखाची देणगी शाळेला प्रदान केली. या देणगीतून शाळेसाठी सर्वसोयींनी युक्त असे क्रीडांगण तयार केले जात आहे. याच्या नामकरण कार्यक्रमावेळी देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, मुख्य चिटणीस शंकर धुरी, देणगीदार निरंजन दीक्षित, शरदचंद्र सातवळेकर, विकास दीक्षित, अभिजीत ऐनापुरे, पडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे, सुरेश देवळेकर, मंजुश्री पाटणकर, शालेय समिती अध्यक्ष श्री. पुजारे आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून संगीत विषयात हार्मोनियम वादन व पखवाज वादनात गांधर्व महाविद्यालयाच्या तिसऱ्या परीक्षेत अनुक्रमे संस्कृती जोशी व कीर्ती पुजारे या विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य प्राप्त केल्यानिमित्त त्यांचे निरंजन दीक्षित यांच्याकडून पाचशे रुपये रोख व प्रशालेचे माजी विद्यार्थी डी. के. केळकर यांच्याकडून एकशे पन्नास रुपये पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. त्यांना मार्गदर्शन करण्याऱ्या सौ. वेलणकर यांचाही सत्कार करण्यात आला. सौ. पाटणकर यांनी नीळकंठ दीक्षित यांच्याविषयी काही आठवणी सांगितल्या. पवार यांनी अध्यक्षीय भाषणात दीक्षित यांच्या दातृत्व, नेतृत्व व कर्तृत्व गुणांचे कौतुक केले. यावेळी विकास दीक्षित, तानवडे, धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नारायण माने यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक श्री. पवार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.