आंदुर्लेत उद्या 
‘नवलाई महिमा’

आंदुर्लेत उद्या ‘नवलाई महिमा’

आंदुर्लेत उद्या
‘नवलाई महिमा’
कुडाळ ः आंदुर्ले येथील प. पू. नामदेव महाराज वटवृक्ष निवास, गोपाळकृष्ण मंदिर येथे गुरुवारी (ता. १३) सायंकाळी सातला ‘नवलाई महिमा’ हे संयुक्त दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. यात गणपती-आपा गावडे, रिद्धी-सिद्धी-केशव गोसावी, नवलासूर-समीर घाडी, करंडकासूर-उदय मोर्ये, नारद-श्रीपाद आरोलकर, सूर्यसुत- संजय वालावलकर, अश्वासेन-मोरेश्वर सावंत, ब्रह्मराक्षस-नागेश तांडेल, ऋषी-स्वप्नील नाईक, इंद्र-उदय भगत, शेतकरी-मंगेश साटम, चारुदत्त तेंडोलकर, नयनतारा-रोशन शिरोडकर, आदिमाया-सिद्धेश मुणनकर, नवलाई देवी-आपा गावडे यांच्या भूमिका आहेत. संगीत साथ हार्मोनियम-काका गोसावी, पखवाज-घन:श्याम मुणनकर, तालरक्षक-सर्वेश धुरी यांची आहे.
-----------------
कणकवली शहरात
गटारांची दुरवस्था
कणकवली ः शहरातील सेवारस्त्यांलगतच्या गटारांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी गटारे उघडी असल्याने अपघात होण्याची भीती आहे. दुरुस्तीसाठी अपघात होण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पाहत आहे का?, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. सेवारस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्यालगत गटारांची काही ठिकाणी झाकणे तुटली आहेत. पावसाळ्यात पाणी साठल्यानंतर गटारांचा अंदाज आला नाही, तर अपघात होऊ शकतो. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांतून होत आहे.
--
लक्षणा नाबर
तालुक्यात आठवी
वेंगुर्ले ः येथील मदर तेरेसा स्कूलची विद्यार्थिनी लक्षणा नाबर हिचे फेरतपासणीत चार गुण वाढल्याने ती आता तालुक्यात आठवी आली आहे. मार्च २०२३ च्या दहावी परीक्षेत लक्षणा नाबर हिला ९३.२० टक्के गुण मिळाले होते. ती तालुक्यात दहावी आली होती; मात्र तिने विज्ञान विषयाचे पेपर फेरतपासणीसाठी पाठविले असता त्यामध्ये चार गुणांनी वाढ झाली. त्यामुळे तिचे गुण ९४ टक्के झाले असून ती वेंगुर्ले तालुक्यात आठवी आली आहे.
----------------
बिबवणेत आज
आरोग्य मार्गदर्शन
कुडाळ ः बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयात उद्या (ता. १२) दुपारी तीनला बिबवणे गावचे सुपुत्र व मुंबईस्थित डॉ. पांडुरंग बिबवणेकर (एम.डी.) यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रात मुलांना असणाऱ्या व्यवसायाच्या संधी व आरोग्यविषयक मार्गदर्शन ते करणार आहेत. विद्यार्थ्यांसोबत पालक तसेच माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मी नारायण विद्यालय व बिबवणे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com