-मेर्वीतील विद्यार्थ्यांनी लुटला लावणीचा आनंद

-मेर्वीतील विद्यार्थ्यांनी लुटला लावणीचा आनंद

Published on

२० (टुडे पान २ साठी)


-rat११p५.jpg-
२३M१५३७१
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वीतील सेमी इंग्रजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भात लावणीचा आनंद लुटला.
-------

मेर्वीतील विद्यार्थ्यांनी लुटला लावणीचा आनंद

पावस, ता. ११ ः मुलांना शेतात काम करण्याची गोडी लागावी व शेतीचे महत्व लहानपणापासून लक्षात यावे, यासाठी रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी-गुरववाडी येथील सेमी इंग्रजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. भात लावणीचे धडे देण्यात आले.
मुख्याध्यापक संतोष मुढे व श्रीमती सोनल तोडणकर यांनी मुलांना भातशेतीची माहिती दिली. भात लागवड करण्याची पद्धत समजावून दिल्यानंतर शाळेतील मुले आणि सोबत शारदा काकी यांनी प्रक्षेत्रामध्ये भात लागवडीचा अनुभव घेतला. मुख्याध्यापक संतोष मुढे म्हणाले की पूर्वीच्या काळी शालेय विद्यार्थी एक मजा म्हणून आई-वडिलांना भात लावणीच्या वेळी मदत करण्याची पद्धत हौसेने करत असत. परंतु कालांतराने या गोष्टी लोप पावल्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या कामांची माहिती आणि आवड निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.