तेनझींग नॉर्गे पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

तेनझींग नॉर्गे पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

Published on

तेनझींग नॉर्गे पुरस्कारासाठी
अर्ज पाठविण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ : युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, केंद्र शासनाद्वारे दरवर्षी साहसी पुरस्कारांतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी १४ जुलैपर्यंत नामांकने मागविली आहेत. तेनझिंग नॉर्गे पुररस्कारासाठी नामांकने सादर करण्यासाठी https://awards.gov.in या पोर्टलवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
या पुरस्कारासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी या ठिकाणी केलेली असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम अत्युकृष्ठ असणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व साहसी उपक्रम करणाऱ्या खेळाडू, नागरिकांना केंद्र शासनाच्या संबंधित पोर्टलवर भेट देऊन तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय केंद्र शासन यांच्याद्वारे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.