विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्जांचे आवाहन

विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्जांचे आवाहन

Published on

विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्जांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ः मुलुंड येथील सुभद्राबाई शिक्षण निधी यांच्यावतीने आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ ची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ३०० हुन अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती केवळ सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी असून, दहावी उत्तीर्ण होऊन सरकारमान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मिळू शकते. जास्त शैक्षणिक खर्च असणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी कर्जाऊ शिष्यवृत्तीचा पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भरलेली फी पावती, मागील वर्षाची गुणपत्रिका, कुटुंबाची शिधा पत्रिका, उत्पन्नाचा दाखला, शाळेच्या दोन शिक्षकांची प्रमाणपत्रे आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड (पीडीएफ फॉरमॅट) आवश्यक आहे. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे, अशी माहिती कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली. गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कोकण संस्थेच्या माणगाव-कुंभारवाडी (ता. कुडाळ) येथे कार्यालयात पूर्ण कागदपत्रांसह भेट द्यावी किंवा subhadrabaishikshannidhi.com या संकेत स्थळावर अर्ज भरावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.