रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

Published on

- rat११p२.jp--१५३६९ प्रशांत जाधव

प्रशांत जाधव यांची
जिल्हाध्यक्षपदी निवड
रत्नागिरी ः एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड. प्रशांत जाधव यांची निवड झाली आहे. शिर्के प्रशालेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक म्हणून जाधव हे परिचित आहेत. मायबाप बालसेवा फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक असलेले जाधव यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळ समाजकार्य केले आहे. एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनकडून देशभरात विविध व्यावसायिक कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम आणि सुमारे ३३ क्रीडाप्रकारातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम व क्रीडाप्रकारांमुळे विद्यार्थ्यांना खूपच फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. क्रीडाप्रकारातील स्पर्धेबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमदेखील फाउंडेशनकडून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात तालुका, जिल्हा व राज्य तसेच देशपातळीवर विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांची निवडचाचणी २० जुलैपर्यंत घेण्यात येणार असल्याचे समजते. या स्पर्धांमध्ये १२ ते २५ वयोगटातील कोणत्याही स्पर्धकांना प्रवेशशुल्क आकारून सहभागी करून घेतले जाणार आहे. ज्युडो, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, बॉक्सिंग आदी खेळांचा समावेश आहे.
-------

पिकविम्याची अंमलबजावणी
काटेकोर पणे करावा ः जाधव
रत्नागिरी ः प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन पीकक्षेत्र पाहून महसूल, कृषी अधिकाऱ्यांनी कृषी विमा उतरवावा. कोणीही शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी मागणी अशोकराव जाधव अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांनी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १ रुपया भरून शेती पिकविमा उतरवावा. विमा मुदत ३० जुलैपर्यंतच असून सोसायटी, ई-सेवा केंद्र येथे ऑनलाईन भरावयाचा आहे. याबाबत शेतकर्‍याने जादा पैसे द्यायचे नाहीत कारण, प्रत्येक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांमागे ई-सेवा केंद्र , सोसायटी यांना ४० रु. शासन परस्पर देणार आहे. शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर तलाठ्यांकडून ज्या प्रकारचे पीक घेतो ते पीक क्षेत्र, आधारकार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स घेऊन जाऊन विमा उतरून घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
----

मत्स्यसंपदा योजनेच्या
प्रचारावर भर देणार
रत्नागिरी ः जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जास्तीत प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार असून, या योजनेमधील उपयोजनांचा जास्तीत जास्त फायदा जिल्ह्यातील मच्छीमारांना मिळावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याची माहिती नवनियुक्त सहाय्यक मत्स्य आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली आहे. शिंदे इनामदार हे मुंबई शहर सहाय्यक मत्स्य आयुक्त होते. त्यांची बदली आता रत्नागिरी मत्स्य विभागात सहाय्यक मत्स्य आयुक्त म्हणून झाली आहे तसेच आनंद पालव यांची मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून रत्नागिरी येथे बदली झाली आहे. या औचित्याने अभयसिंह शिंदे इनामदार व आनंद पालव पत्रकारांशी संवाद साधत होते. या वेळी अभयसिंह शिंदे इनामदार म्हणाले, मच्छीमार मासेमारी करत असताना सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे काही वेळेला मोठ्या आर्थिक नुकसानीची सामोरे जावे लागते तसेच काहीवेळेला जीवितहानीसुद्धा होते. याकरिता शासनाने निर्धारित केलेले जे सुरक्षा नियम आहेत त्यांची जास्तीत जास्त जनजागृती मत्स्य विभागामार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.