चिपळूण ः चिपळुणातील गणपती बाप्पा आता फेटा, धोतीत

चिपळूण ः चिपळुणातील गणपती बाप्पा आता फेटा, धोतीत

Published on

फोटो ओळी
-rat११p२४.jpg, M१५४१७ ,,rat११p२५.jpg ः M१५४१८ चिपळूण ः सौरभ महाजन याने साकारलेल्या गणेशमूर्ती.


चिपळुणातील गणपती बाप्पा आता फेटा, धोतीत
सौरभ महाजन ; उदध्वस्त गणेशशाळा पुन्हा उभारली
चिपळूण, ता. ११ ः दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुराने सर्व गणेशचित्र शाळा उद्ध्वस्त झाल्या. गणपती कारखानदार, कारागीर यांना याचा मोठा फटका बसला. मात्र, यातून पुन्हा उभारी घेत प्रचंड इच्छाशक्ती बळावर अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया चिपळूण मुरादपूर येथील सौरभ महाजन या तरुण कलाकाराने साधली आहे. त्याने नव्या रूपात नव्या ढंगात गणेशमूर्तीचे अनोखे रूप साकारले आहे. कापडी फेटाधारी व धोती नेसवून गणपती बाप्पांना नवा साज चढवला आहे.
त्रिमूर्ती गणेशचित्र शाळा या नावाने गेली कित्येक वर्षे चिपळूण मुरादपूर येथे राजू महाजन यांचा गणपती कारखाना आहे. पीओपी व शाडूच्या मातीपासून बनवलेल्या जाणाऱ्या येथील गणेशमूर्तींना जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोठी मागणी असते. आकर्षक, सुबक मूर्ती, नेत्रदीपक रंगकाम यामुळे महाजन यांच्या गणेशमूर्ती गणेशभक्तांच्या पसंतीत उतरलेल्या दिसून येतात. अशा या गणेशचित्र शाळेला चिपळुणात दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुराने उद्ध्वस्त करून टाकले होते. सर्व गणेशमूर्ती पुराच्या पाण्याने वाहून गेल्या होत्या. सर्वच गणेशचित्र शाळांचे अपरिमित असे नुकसान त्या वेळी झाले होते. शासनाने केवळ ५० हजार रुपये नुकसानभरपाई देऊन या गणेशचित्र शाळा मालकांची बोळवण केली होती. मात्र, अशा अवस्थेतही येथील गणेशचित्र शाळांनी आपल्या इच्छाशक्ती व कलेच्या बळावर पुन्हा एकदा उभारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
गणेशमूर्तीकार सौरभ महाजन याने गणेशभक्तांना वेगळ्या प्रकारे गणेशमूर्ती दिल्या पाहिजेत, अशी इच्छा बाळगून त्याने जिल्ह्यात अशाप्रकारचा प्रयोग करण्याचा निर्धार केला होता. पेणच्या धर्तीवर मुरादपूर येथे त्याने गणपतीच्या डोक्याला आकर्षक कापडी फेटा, धोती घालून गणराय साकारले आहेत. शाडू आणि पीओपीच्या आकर्षक गणेशमूर्तीचे भव्य प्रदर्शन त्याने भरवले आहे. धोतर, फेटा परिधान करून मूर्तीमध्ये जीवंतपणा आणत तसे हुबेहुब दिसणारे गणपत्ती बाप्पा त्याने साकारले आहेत.

चौकट -
३० मिनिटात प्रभू रामाची मूर्ती बनवली
रामनवमीला चिपळुणातील हिंदू युवामंचने सांस्कृतिक केंद्र येथील वेस मारूती मंदिरासमोर एक कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी हिंदू युवामंचने सौरभ याला मूर्तिकला सादर करण्याची संधी दिली होती. या संधीचे सोने करत सौरभने केवळ ३० मिनिटांत प्रभू रामाची मूर्ती बनवली होते. या वेळी सौरभच्या कलेचे उपस्थितांनी कौतुक केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.