चिपळूण-पाऊस लांबला, 10 टक्केच लावणी

चिपळूण-पाऊस लांबला, 10 टक्केच लावणी

पान ५ मेन शेजारी

फोटो ओळी
-ratchl१११.jpg ःKOP२३M१५४३७ चिपळूण ः पाऊस लांबल्याने दुसरीकडून पाण्याची व्यवस्था करून सुरू असलेली लावणीची कामे.

पाऊस लांबला, १० टक्केच लावणी पूर्ण

चिपळूण तालुका ; चार दिवसात केवळ ४२ मिमी पाऊस

चिपळूण, ता. ११ ः सुरवातीपासूनच हुलकावण्या देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यातही पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे. गेल्या ३ दिवसात सरासरी अवघा ४२ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात बहुतांशी ठिकाणी भातलावणीचे काम ठप्प झाले आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण भात लागवड क्षेत्राच्या केवळ १० टक्के पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागातील डोंगर उतारावरील शेती कोरडी पडली आहे. पाऊस आणखी लांबल्यास रोपांचेही नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.
यावर्षी रोहिणी नक्षत्रावर पाऊस न आल्याने पेरणी लांबली. त्यानंतरही २४ जूनपर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. याचवेळेस झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस गुजरातच्या दिशेने सरकल्याचे सांगितले जात होते; मात्र त्यानंतर जूनअखेरीस दमदार पावसाला सुरवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यातदेखील पावसाचा जोर चांगला होता. भाताची रोपे तयार झाल्याने पहिल्या आठवड्यात भातलावणीच्या कामाला वेग आला होता; मात्र गेल्या चार दिवसापासून पावसाने पूर्णतः उघडीप घेतली असून कडक उन्हामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. परिणामी, शेतजमीन कोरड्या पडू लागल्या आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागात भातशेतीची कामे ठप्प झाली आहेत.
तालुक्यात एकूण १० हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली येते. त्यापैकी केवळ १००५ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड झाली आहे. अजूनही ९० टक्के भातशेती लागवडीचे काम शिल्लक आहे. अशा परिस्थितीत पाऊस न पडल्यास आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसात केवळ ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातील दोन दिवसात १० मिलीमीटर देखील पाऊस झालेला नाही. ग्रामीण भागात कालवे, पाझर किंवा तलावांच्या स्वरूपात काही ठिकाणी पाणी उपलब्ध असले तरी ते शेतजमिनीत आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच परिसरातील विहिरींची पाणीपातळी पुन्हा घटल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.


कोट
तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातलावणीची कामे रखडत चालली आहेत. चिपळूण तालुक्यात १० हजार भातलागडीचे क्षेत्र आहे. मात्र त्यापैकी केवळ १० टक्केच भातलावणीची कामे झाली आहेत. एक- दोन दिवसात चांगला पाऊस झाल्यास भातलावणीची कामे लवकर पूर्णत्वास जातील.
- राहुल आडके, मंडळ कृषी अधिकारी, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com