दाभोळ-शोध कलारत्नांसाठी सहा कार्यशाळा घेणार

दाभोळ-शोध कलारत्नांसाठी सहा कार्यशाळा घेणार

Published on

शोध कलारत्नांसाठी सहा कार्यशाळा घेणार
दापोलीत पहिली कार्यशाळा ; चार गटातून निवडले २१ विद्यार्थी
दाभोळ, ता. ११ ः व्हिजन दापोली उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मागील शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद रत्नागिरीच्यावतीने विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शोध कलारत्नांचा या उपक्रमातून वर्षभरात सहा कार्यशाळांचे अयोजन करण्यात येणार असून तालुक्यातील चार गटातून निवडलेले २१ विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांची कार्यशाळा पालकांच्या उपस्थितीत दापोली अर्बन महाविद्यालयाच्या दापोलीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे दीपप्रज्वलन कार्यशाळेतील छोट्या विद्यार्थिनींच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विस्तार अधिकारी संजय दरेकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. एक चित्र हजार शब्दांचे कार्य करते, असे सांगत अगदी पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील कलाविष्कार जोपासता यावा, या उद्देशाने मुलांच्या उपजत कलेला वाव देऊन त्यांची प्रगती साधता येईल, असे मत गटशिक्षणाधिकारी बळवंतराव यांनी व्यक्त केले.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील तज्ञ मार्गदर्शकांकडून धडे घेतलेले मार्गदर्शक एम. डी. चव्हाण, संजय निवाते, अभिषेक बुरटे, महेंद्र सागवेकर, श्रीराम महाजन आणि रियाज म्हैशाळे आदींनी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून दिवसभर रंग आणि कुंचला यामध्ये व्यस्त ठेवत त्यांना मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांना सरावासाठी वर्षभर पुरेल एवढे कला विषयासाठी सर्व साहित्य जिल्हा परिषदेने पुरवले आहेत. वर्षभरात अशा सहा कार्यशाळा पार पडणार असून, यामधील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट चित्र काढणार्‍या विद्यार्थ्यांसह संबंधित शिक्षक यांनाही जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.