माजी विद्यार्थ्यांकडून कुलगुरू डॉ. भावेंचा सत्कार

माजी विद्यार्थ्यांकडून कुलगुरू डॉ. भावेंचा सत्कार

Published on

पान २ साठी

माजी विद्यार्थ्यांकडून
कुलगुरू डॉ. भावेंचा सत्कार
दाभोळ, ता. ११ ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांचा सत्कार १९८३ च्या बॅचमधील डॉ. संजय भावे आणि त्यांच्यासोबत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी केला. या वेळी चिंतामणी देशमुख (निवृत्त तहसीलदार) यांनी विद्यापीठाला जाणतेपणा देण्याचे काम कुलगुरू डॉ. संजय भावे करतील, असा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘‘कोकण कृषी विद्यापीठाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. भावे भूमिपुत्र असल्यामुळे येथील वातावरणाची आणि कोणत्या प्रकारचे संशोधन, शिक्षण आणि विस्तारकार्याला गती देणे आवश्यक आहे, याची त्यांना जाण आहे. या वेळी १९८३ च्या बॅचचे १५ माजी विद्यार्थी उपस्थित होते. केवळ सन्मान आणि सत्कार हा एकमेव उद्देश नसून माजी विद्यार्थ्यांनी आपण या विद्यापीठासाठी विविध प्रकारचे योगदान देण्याचे मान्य केले. कोकणच्या निसर्गसंपदेचा यथायोग्य वापर तसेच तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले. आंबा बागायतदारांच्या अडचणी कशा सोडवता येतील यासाठी प्रयत्न करणे, कोकणातील असलेल्या चढ-उतारावरील आणि कमी आकाराच्या जमिनी यासाठी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी विनंती सदानंद बोंद्रे यांनी केली तसेच दुग्धोत्पादनासाठी हिरवा चारानिर्मिती, बेसुमार होत असलेली जंगलतोड आणि वणवा कमी करणे यासाठी ठोस उपाययोजनांची निर्मिती करणे, सेंद्रिय शेती उत्पादनावर भर देऊन शेतीला प्रतिष्ठा निर्माण करून देणे यावर औद्योगिक वसाहतींप्रमाणे शेती औद्योगिक वसाहती निर्माण करून शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या साधनसंपत्तीचा पुरवठा करणे. अॅव्हाकोडासारख्या पिकाला गतिमान करणे आवश्यक असल्याचे सुचित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.