-भोस्ते पुलावर अवजड वाहनांना ''नो एन्ट्री

-भोस्ते पुलावर अवजड वाहनांना ''नो एन्ट्री

५२ (पान ३ साठी)


-rat११p४०.jpg
२३M१५५११
ः खेड ः भोस्ते पुलावर उभारण्यात आलेला लोखंडी गेट.
----------
भोस्ते पुलावर अवजड वाहनांना ''नो एन्ट्री''

खेड, ता. ११ ः येथील जगबुडी पुलावर असलेला भोस्ते पूल कमकुवत झाल्याने या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आले असल्याचा नाव फलक लावण्यात आला आहे. तरीदेखील अवजड वाहने या पुलावरून जात असल्याने या वाहनांना रोखण्यासाठी आता लोखंडी गेट उभारण्यात आल्याने अवजड मानाने ''नो एन्ट्री'' करण्यात आली आहे.
वाहतुकीच्यादृष्टीने उपयुक्त असलेला भोस्ते पूल भोस्ते, अलसुरे, कोंडीवली या गावासह रेल्वेस्थानक यांना जोडणारा महत्वपूर्ण आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून हा पूल कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार येथील प्रशासनाकडून पुलावर अवजड वाहनांना बंदीचा बॅनर लावण्यात आला आहे; मात्र असे असूनदेखील रात्रीच्या सुमारास वाळूचे ट्रक व अन्य अवजड वाहने या पुलावरून धावत असल्याची बाब उघड झाली आहे. दरम्यान, या पुलावर आता लोखंडी गेट उभारण्यात आला असून जेणेकरून मोठी अवजड वाहने जाण्यास प्रतिबंध होईल. त्यामुळे आता अवजड वाहनांना कायमचा ब्रेक लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com