तांबेडीजवळ गोवा बनावटीची अवैध दारू जप्त

तांबेडीजवळ गोवा बनावटीची अवैध दारू जप्त

Published on

५३ (पान ३ साठी)

तांबेडीजवळ अवैध दारू जप्त

संगमेश्वर पोलिसांची कारवाई ः २ लाख ९६ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

साडवली, ता.११ ः तांबेडी येथे संगमेश्वर पोलिसांनी गोवा बनावटीची दारू अवैधपणे विक्रीसाठी नेत असताना कारवाई केली. सर्वेश भास्कर केसरकर (वय २७, रा. सार्ताडा तरचावाडा, सावंतवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दारूसाठा गाडीसह जप्त करण्यात आला. पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून संशयित निसटला होता. तांबेडी गावातील पोलिसपाटील संतोष ब्रीद यांना पोलिसांनी माहिती दिली असता त्यांनी गावातील लोकांसह गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही चकवा देत गाडी सांगळेवाडी तांबेडी या चढावावर गाडी थांबलेली आढळून आली. गाडीची पंचासमक्ष तपासणी केली असता पाठीमागच्या बाजूस बॉक्स आढळून आले. त्या वेळी सर्वेश केसरकर हा तिथे आला असता त्याकडे परवाना मागितला तो नसल्याचे सांगून मी घाबरून गाडी येथे थांबवली असल्याचे सांगितले. त्याच्याकडून विविध प्रकारची गोवा बनावटीची दारू अवैधपणे विक्रीसाठी नेत असलेले बॉक्स मिळून आले. त्याच्या ताब्यातील गाडीसह २.९६६०८ रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले. याबाबतचा अधिक तपास संगमेश्वर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शंकर नागरगोजे, चंदू कांबळे, सचिन कामेरकर, किशोर जोयशी, सचिन जाधव आदी करत आहेत.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.