कोंडवाड्याअभावी शहरातील गुरे मोकाट

कोंडवाड्याअभावी शहरातील गुरे मोकाट

१५४३६
15542


कोंडवाड्याअभावी गुरे मोकाट
रत्नागिरी नगरपालिकेची डोकेदुखी; नागरिक त्रस्त, तीन घोडे ताब्यात

रत्नागिरी, ता. ११ ः शहरात मोकाट गुरे आणि त्यांच्या कोंडवाड्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात शहरभर फिरणारी रस्त्यात ठाण मांडलेली गुरे वाहनचालकांसह नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. नुकतेच शहराजवळील मिऱ्या गावामध्ये एका बेभान झालेल्या बैलाने दहा ते बारा लोकांना जखमी केले होते. त्यामुळे रत्नागिरी शहरातील शाळकरी मुलांसह नागरिक आणि वाहनचालकांमध्ये मोकाट गुरांची भीती निर्माण झाली आहे. या मोकाट गुरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालिकेकडे सुरू झाली आहे.
शहरात गाडीतळ, खालची आळी, आठवडा बाजार, रामआळी, धनजीनाका, मच्छीमार्केट, जयस्तंभ, गोखलेनाका, जिल्हा रुग्णालयासमोरील भाग, मारुती मंदिर, जेलनाका अशा एक ना अनेक ठिकाणी ही मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात. शहरातील या मोकाट गुरांनी जनतेला हैराण करून सोडले आहे. त्यात काही मस्तावलेल्या बैलांची झुंज लागते आणि अनेकांच्या वाहनांचे नुकसान करतात किंवा सैरावैरा पळत असल्याने अपघात घडतात. पालिकेने या मोकाट गुरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवावे. जोवर मालक दंड भरत नाही, तोवर त्यांना सोडू नये, अशी शहरवासीयांची मागणी आहे; परंतु पालिकेची याबाबत मोठी गोची झाली आहे. पालिकेचा कोंडवाडाच नसल्याने आणि पकडलेल्या गुरांची देखभाल होत नसल्याने पालिका गुरे पकडण्याच्या फांद्यात पडत नसल्याचे बोलले जाते; मात्र पालिकेची अशीच बघ्याची भूमिका राहिली तर शहरात या मोकाट गुरांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला पालिका जबाबदार राहणार आहे का, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

कोट ः
नगरपालिकेकडे कोंडवाड्यासाठी जागा नाही. कोंडवाड्याचा प्रश्न असल्याने कर्मचाऱ्यांमार्फत मोकाट गुरांना हद्दीबाहेर हुसकावण्याचे काम सुरू आहे. शहरात येणार नाही या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, तसेच शहरात घोडेही मोकाट सोडले गेले आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.
- तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com