मत्स्यशेती पुस्तक प्रकाशन

मत्स्यशेती पुस्तक प्रकाशन

KOP23M15539
ओळ
रत्नागिरी - ‘मिठे जल मे मछली पालन’ या हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करताना लेखक डॉ. विजय जोशी व इतर मान्यवर

डॉ. विजय जोशी यांच्या
मत्स्यशेतीवरील पुस्तकाचे प्रकाशन
रत्नागिरी, ता. ११ : मत्स्यशेतीविषयी सोप्या भाषेत आणि सखोल माहिती देणाऱ्या ‘मिठे जल मे मछली पालन’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (ता.१०) रत्नागिरी येथे झाले. रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी यांनी मत्स्य क्षेत्रातील ४० वर्षांच्या अनुभवावरून हे पुस्तक लिहिले आहे. मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रोव वेल इंटरनॅशनल फिड कंपनीचे उपाध्यक्ष संदीप अहिरराव उपस्थित होते. नाबार्ड उत्तराखंडचे मुख्यसरव्यवस्थापक विनोद बिष्ट, मस्यविभागाचे संचालक डॉ. त्रिवेदी, उपसंचालक प्रमोद कुमार शुक्ला, अभय देशपांडे, नाबार्डचे उपसरव्यवस्थापक पाठक, डॉ. प्रथमेश जोशी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.
आत्तापर्यंत हिंदी भाषेत मत्स्यशेतीचे एकत्रित माहिती देणारे पुस्तक उपलब्ध नव्हते. ते आता उपलब्ध झाले आहे.
महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादक यांबरोबरच मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल इ. सर्व प्रांतांमधील मत्स्य शेतकरी तसेच मत्स्य विषयातील विद्यार्थी, मत्स्य अधिकारी, बँक अधिकारी या सर्वांना पुस्तक उपयोगी ठरेल, असा विश्वास डॉ. जोशी यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन पल्लवी गोडसे यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिकेत कोनकर, परेश गुरव आणि सौ. सुनेत्रा जोशी यांनी विशेष सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com