सातार्ड्यात तरुणाची
गळफासाने आत्महत्या

सातार्ड्यात तरुणाची गळफासाने आत्महत्या

Published on

15543
राजेश भगत

सातार्ड्यात तरुणाची
गळफासाने आत्महत्या
सावंतवाडी, ता. ११ ः सातार्डा-भटवाडी येथील तरुण राजेश रवींद्र भगत (वय ३०) याने सोमवारी (ता. १०) रात्री दहाच्या सुमारास राहत्या घराच्या खोलीत कंबर बेल्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. येथील पोलिस ठाण्यात याबाबतची खबर त्याच्या भावोजींनी दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
राजेश भगत हा पर्वरी-गोवा येथील मॉलमध्ये वाहतूक व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. काळोबा स्पोर्ट क्लबचा तो अष्टपैलू, दर्जेदार क्रिकेटपटू होता. रवळनाथ क्रिकेट क्लब, आरटीएम स्पोर्ट क्लब रायाचेपेड, महापुरुष स्पोर्ट क्लब, तरचावाडा या क्रिकेट क्लबसाठी त्याने भरीव योगदान दिले होते. भटवाडीतील विविध सामाजिक कामांमध्ये त्याचा सहभाग होता. मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. पश्चात आई, बहीण असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.