खचलेल्या बाजूपट्टीत डंपर रुतला

खचलेल्या बाजूपट्टीत डंपर रुतला

Published on

15565
दोडामार्ग : खचलेल्या बाजूपट्टीत रुतलेला डंपर. (छायाचित्र ः संदेश देसाई)

खचलेल्या बाजूपट्टीत डंपर रुतला

दोडामार्गातील प्रकार; वाहनचालकांतून डागडुजीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ : येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्याची बाजूपट्टी खचल्याने त्यात डंपर फसल्याची घटना आज दुपारी बांदा-आयी राज्यमार्गावर घडली. खचलेली बाजूपट्टी अपघातांना निमंत्रण देत असून सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
बांदा-आयी राज्यामार्गाच्या बाजूपट्टीची खोदाई करून खासगी कंपनीच्या गॅस पाईपलाईनचे काम करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर ते चर मातीने बुजविण्यात आले; मात्र पावसाळा सुरू होताच बाजूपट्टी जागोजागी खचू लागली. सध्या या मार्गावर बाजूपट्टीत वाहने रुतून अनेक अपघात होत आहेत. दोडामार्गहून आयीला जाणाऱ्या डंपरला असाच अपघात झाला. हा डंपर खडीची पावडर घेऊन जात होता. येथील बाजारपेठेत समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी चालकाने डंपर रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला; मात्र खचलेल्या बाजूपट्टीचा अंदाज न आल्याने डंपर चरात रुतला. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. या राज्यमार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने यावर उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.