गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची निवड

गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची निवड

१३ (पान २ साठी, संक्षिप्त)


-rat१७p२.jpg ः
२३M१६६३५
दापोली ः शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करताना गटशिक्षणाधिकारी बळवंतराव.
-------------

शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची निवड

दाभोळ ः पाचवी व आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत दापोली तालुक्यातून पाचवीसाठी २८ व आठवीसाठी २० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी पाचवीमध्ये २० विद्यार्थी जि. प. शाळा आठवीमध्ये ४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पाचवीमध्ये हर्णै मराठी शाळेची विद्यार्थिनी सृष्टी चौधरी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ७वी आली असून, तालुक्यात तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आठवीसाठी मळे व बोरिवली या दोनच जिल्हा परिषद शाळात वर्ग असून, त्या दोन्ही शाळांतून ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. हा व्हिजन दापोलीचा इफेक्ट असून, सर्वांनी त्यासाठी गेल्या वर्षभरात घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी व्हिजन दापोली समितीची सर्व टीम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे शिक्षण विभाग दापोली यांच्याकडून गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी अभिनंदन केले.
----
-rat१७p१४.jpg ः
२३M१६६६८
कौस्तुभ बने
---
शिष्यवृत्ती परीक्षेत कौस्तुभ बनेचे यश

साखरपा ः भवानी शंकर शिक्षणसंस्था, मिरज संचालित साखरपा येथील श्रीमान दत्तात्रय कबनुरकर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी कौस्तुभ बने याने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कौस्तुभ याला २१४ गुणांसह ७१.८१ टक्के गुण मिळाले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या मेरिट लिस्टनुसार कौस्तुभ याने तालुक्यात सहावा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका लीना कबनुरकर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
-----

रोहन मापुस्कर यांची २९, ३० ला अभिनय कार्यशाळा

रत्नागिरी ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांची अभिनय कार्यशाळा २९ ते ३० जुलैला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये अभिनय, आवाज, करियर आणि ऑडिशनबाबत सविस्तर आणि सखोल माहिती दिली जाणार आहे. मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कास्टिंग डिरेक्ट आहेत. अजूनपर्यंत थ्री इडियट्स, लगे रहो मुन्नाभाई, फेरारी की सवारी, ठाकरे, काही सांगायचंय, उनाड अशा गाजलेल्या अनेक चित्रपटाचे कास्टिंग त्यांच्याकडून करण्यात आले होते. इच्छुकांनी शिबिरात सहभागी होण्याकरिता येथील रंगकर्मी प्रफुल्ल घाग, सनातन रेडीज, अमेय धोपटकर, डॉ. आनंद आंबेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नाट्य परिषदेने कले आहे.
---------
-rat१७p१५.jpg ः
२३M१६६६९
तनया आंब्रे
--------------
शिष्यवृत्ती परीक्षेत तनया आब्रेंचे यश

रत्नागिरी ः पूर्व उच्च प्राथमिक राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पाचवी परीक्षेमध्ये ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तनया आंब्रे ही महाराष्ट्र राज्यात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून, सेक्रेटहार्ट कॉन्व्हेट स्कूलमध्ये प्रथम आली आहे. सर्व स्तरावरून तिचे अभिनंदन होत आहे. तनया शहरातील उद्यमनगर येथील सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पाचवीमध्ये शिकत आहे. तनयाला तिची आई अॅड. सुनीता व अॅड. मच्छिंद्र आंब्रे आणि बहिण केया आंब्रे तसेच स्कूलमधील शिक्षक, मार्गदर्शक मनमाडकर, सिस्टर नाटाल, मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
---
-rat१७p१६.jpg ः
२३M१६६७०
रत्नागिरी ः स्टेट को-ऑप. बॅंके व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या प्रशिक्षणात प्रमाणपत्र स्वीकारताना जयवंत कदम.
----------
प्रशिक्षणार्थींचा प्रमाणपत्र देऊन गौरव

रत्नागिरी ः दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि. मुंबई -दी विदर्भ को-ऑप. बँक लि., शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्था वाशी, नवी मुंबई व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. नुकतेच हे प्रशिक्षण माळनाका येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. रत्नागिरी येथे उत्साहात झाले. या वेळी विविध सहकारी सोसायटी तसेच बॅंकेचे पदाधिकारी या प्रशिक्षणाला उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे संचालक आबा पाटील, प्रशिक्षक पी. व्ही. तावडे, सुर्वे, व्ही. पी. सावंत यांच्या हस्ते बसणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन जयवंत बापूराव कदम यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील ३० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com