स्वरुपानंदाच्या आर्शिवादाने मुद्रण व्यवसायाची मुहूर्तमेढ

स्वरुपानंदाच्या आर्शिवादाने मुद्रण व्यवसायाची मुहूर्तमेढ

२ (पान २ साठी, अॅंकर)


-rat१७p४३.jpg ः
२३M१६७४९
पावस ः गोळप कट्टा कार्यक्रमांमध्ये ज्ञानेश्वर मुद्रालयचे मालक श्रीकांत जोशी यांची मुलाखत घेताना आदिती काळे.
---------------

स्वरुपानंदाच्या आर्शिवादाने मुद्रण व्यवसायात

श्रीकांत जोशी ; अनुभव, निरीक्षणाने शिकलो

पावस, ता. १७ ः वडिलांनी फटाका व्यवसाय, किराणा दुकान व ठेकेदार इत्यादी अनेक व्यवसाय केले; मात्र त्यामध्ये नेहमीच तोट्यात होते. अखेर मित्रांच्या ओळखीने पावस येथील स्वामी स्वरूपानंदांकडे आल्यानंतर त्यांनी मुद्रण व्यवसायाकडे वळलो, असे सांगितल्यानंतर त्या व्यवसायाकडे वळल्यानंतर मी स्वतः नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या मुद्रण व्यवसायात लक्ष घालण्याची ठरवले. अनुभवाने व निरीक्षणाने शिकत गेलो. त्यात यश मिळत गेले आणि मुद्रण व्यवसायास स्थिर झालो, असे गोळप कट्टाच्या ४५ व्या कार्यक्रमात रत्नागिरीतील प्रसिद्ध ज्ञानेश्वर मुद्रणमंदिरचे मालक श्रीकांत जोशी यांनी सांगितले.
येथील गोळप कट्ट्यावर त्यांची प्रकट मुलाखत आदिती काळे यांनी घेतली. ते म्हणाले, आम्ही जोशी मूळ रत्नागिरीतील. आम्ही आठ भावंडे. परिस्थिती बेताची. वडिलांनी फटाका विक्री, किराणा दुकान, ठेकेदार इत्यादी अनेक व्यवसाय केले; मात्र सगळे तोट्यात गेले होते. शेजारी राहत असलेले स्वामी स्वरूपानंद यांचे मित्र बाबा देसाई बाबांना घेऊन स्वामी स्वरूपानंद यांच्याकडे गेले आणि परिस्थिती सांगितली. स्वामींनी बाबांच्या हातावर सव्वा रुपया ठेवला आणि मुद्रण व्यवसाय करायला सांगितले आणि छापखाना न म्हणता मुद्रणमंदिर म्हणा, असे सांगितले. त्यानंतर मुद्रणालय सुरू झाले. सुरवातीला स्वामींचे नित्यपाठ पोथीचेच काम मिळाले. त्याच्या प्रूफ रीडिंगसाठी मी स्वामींकडे जात असे. त्याचे पूर्ण प्रूफरीडिंग स्वामी यांनी केले आहे. वडिलांनी खूप कष्टाने सुरू केलेला मुद्रण व्यवसाय आपण पुढे चालवावा, त्यातच लक्ष घालावे असे ठरवले. अनुभवातून, निरीक्षणातून शिकत गेलो. त्या काळी यातील शिक्षण कोठे उपलब्ध नव्हते. खिळे जुळवून छपाई होत असे. रामआळीत वडिलांनी १९६२ ला भाड्याने जागा घेतली होती. २००४ पर्यंत आम्ही तेथे काम केले. त्यानंतर गीताभवनसमोर शंखेश्वर इमारतीत दोन गाळे घेतले. त्यानंतर कामांना वेग आला. वडिलांचे १९८८ मध्ये निधन झाले. गेली काही वर्षे माझ्या मुली व्यवसायात मदत करतात. पत्नीचे मोठे योगदान आहे आणि कामगारांमुळे व्यवसायात भरारी घेऊ शकलो.
-------
असंख्या माणसे जोडली
पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे बाणकोट ते सावंतवाडी, बांदापर्यंत लोकांची कामे करत असू. या छापखान्यामुळे आयुष्यात असंख्य माणसे जोडली गेली. ग्राहक वर्षानुवर्ष विश्वासाने काम देत असतात. महाराष्ट्र मुद्रण परिषद आहे. सगळ्या मुद्रणालय व्यावसायिकांची त्यांचा मी छापलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पत्रिकेला उत्कृष्ट पत्रिका पुरस्कार मिळाल्याचे जोशी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com