दिशा, शुभमची शिष्यवृत्तीत भरारी

दिशा, शुभमची शिष्यवृत्तीत भरारी

Published on

४८ (टुडे पान ३ अॅंकर )

-rat१७p५३.jpg ः
KOP२३M१६८१०
शुभम घाग
-rat१७p५२.jpg ः
KOP२३M१६८०९
दिशा उंडे
-----------

दिशा, शुभमची शिष्यवृत्तीत भरारी

झोपडीत राहून अभ्यास; मेहनतीने गरिबीवर मात

रत्नागिरी, ता. १८ ः संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोठणे पुनर्वसनमध्ये झोपडीत राहून दिशा उंडे, शुभम घाग हे दोन विद्यार्थी पाचवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले आहेत. मेहनतीच्या जोरावर आलेल्या अडचणींवर मात करत या दोघांनाही यश मिळवले आहे.
शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. या परीक्षेत गोठणे पुनर्वसन शाळेमधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. शाळेचा निकालही १०० टक्के लागला आहे. जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गोठणे हे गाव चांदोली अभयारण्यात गेल्यामुळे या गावाचे पुनर्वसन काही वर्षांपूर्वी तालुक्यातील हातिव येथे करण्यात आले. गेली अनेक वर्षे पुनर्वसन झालेले असतानाही शासनाने त्यांना म्हणाव्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अजूनही पक्की घरे बनवण्यात आलेली नाहीत. झोपडीतच ही कुटुंबे राहत आहेत. पक्की घरे नसल्यामुळे या कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शाळेतील शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने या मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत आहे. झोपडीत राहूनच संघर्ष करत या मुलांना अभ्यास करावा लागतो. शाळेतील दिशा तुकाराम मुंडे व शुभम दीपक घाग यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रमेश जयराम शिवगण यांच्यासह मुख्याध्यापक रेश्मा यादव, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, युगंधरा सुर्वे, प्रज्ञा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
------------
दरवर्षी १०० टक्के निकाल
या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक घरगुती अडचणींना सामना करावा लागत असला तरी शिक्षकांच्या मेहनतीमुळे शिष्यवृत्ती परीक्षेला गेले ५ वर्ष १०० टक्के निकाल लागत आहे. आत्तापर्यंत ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत तसेच रत्नागिरी टॅलेन्ट सर्च, आमचा गणिताचा भास्कराचार्य, जाणू विज्ञान अनभवू विज्ञान या परीक्षेमध्येही विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.