वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष
गिरप यांना ''कोकण आयडॉल''

वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष गिरप यांना ''कोकण आयडॉल''

Published on

16934
मुंबई ः येथे वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा पुरस्कार देऊन मान्यवरांचा सन्मान केला.


वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष
गिरप यांना ‘कोकण आयडॉल’

वेंगुर्ले, ता. १८ ः शहराचा टीमवर्कच्या माध्यमातून विकासात्मक कायापालट केल्याबद्दल कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थांतर्फे येथील माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना ‘कोकण आयडॉल’ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थतर्फे भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा कोकण व्हिजन २०३० परिषदेत देण्यात आला. मुंबई दादर (पूर्व) हिंदू कॉलनी येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या परिवारातले तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले, छत्रपती शिवरायांचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक व संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण आयडॉल पुरस्कार देऊन गिरप यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराबाबत त्यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.