-प्रशांत राऊत ठरले उत्कृष्ट गटविकास अधिकारी

-प्रशांत राऊत ठरले उत्कृष्ट गटविकास अधिकारी

२२ (टुडे पान २ साठी)


-rat१८p१९.jpg ः
२३M१६९१८
गुहागर ः गटविकास अधिकारी प्रशांत राऊत
---------
प्रशांत राऊत ठरले उत्कृष्ट गटविकास अधिकारी

गुहागर, ता. १८ ः येथील गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने उत्कृष्ट गटविकास अधिकारी म्हणून निवड केली आहे. महिला बचतगट, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, निसर्ग चक्रीवादळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत केलेले कार्य, पायाभूत सुविधांचा विकास, शेतीमधील प्रयोगांना प्रोत्साहन, विविधांगी कामात प्रशांत राऊत यांनी आपला ठसा उमटवला आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटणमधील स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ राऊत यांचे सुपुत्र प्रशांत राऊत पाटण तालुक्यातच मुळगाव येथे साडेनऊ वर्ष ते शिक्षक म्हणून काम करत होते. त्याच तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणूनही त्यांनी साडेतीन वर्ष काम केले. महाराष्ट्र सेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर मेहकर (जि. बुलढाणा) येथे साडेतीन वर्ष बालविकास प्रकल्प अधिकारी, खामगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केले. २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात साडेचार वर्ष, चिपळूण तालुक्यात २ वर्ष गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले. जून २०२२ मध्ये गुहागर तालुक्यात राऊत गटविकास अधिकारी म्हणून बदली होऊन आले. तेव्हा बचतगटांना बँकांकडून मिळणारे आर्थिक साह्य १५ कोटींनी वाढवून महिला बचतगटांना कार्यान्वित केले. तहसील प्रशासनाला सोबत घेत गुहागरमध्ये बचतगटांच्या उत्पादनांचा मेळावा घेतला. गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांना सोबत घेत मिशन शिष्यवृत्ती उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या १३ झाली. तालुक्यातच गांडुळखताची मागणी जास्त असल्याने राऊत यांनी कौंढर काळसूर आणि खामशेत येथील महिला बचतगटांना गांडुळखत निर्मिती प्रकल्पासाठी प्रोत्साहन दिले. आज हे दोन्ही बचतगट गांडुळखताचे टनावारी उत्पन्न घेत आहेत. हळद लागवडीला प्रोत्साहन म्हणून सलग दोन वर्ष स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती कृषी विभागातर्फे केले जात आहे. कोकण विभागातील राऊत यांच्या कामाची दखल ग्रामविकास मंत्रालयाने घेत त्यांना उत्कृष्ट गटविकास अधिकारी या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com