कुडाळकर हायस्कूलमध्ये
शैक्षणिक साहित्य वाटप

कुडाळकर हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

Published on

16970
मालवण ः कुडाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कुडाळकर हायस्कूलमध्ये
शैक्षणिक साहित्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळा, मालवणच्या विद्यार्थ्यांसाठी मिलिंद नार्वेकर आणि बेस्ट शिव-हनुमान सेवा मंडळ, मुंबई यांच्या विशेष सहकार्यातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय मालवणचे उपाध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ६० डझन वह्या, बेस्ट शिव-हनुमान सेवा मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून ३५ डझन वह्या, ज्ञानेश्वर अरोंदेकर, निखिल काजरोळकर, प्रशांत परब यांच्याकडून प्रत्येकी दोन डझन वह्या शाळेला प्राप्त झाल्या. सांप्रदायचे कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांच्या हस्ते आणि संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, खजिनदार विनायक निवेकर, केंद्रप्रमुख श्री. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्यांचे वाटप करण्यात आले. प्रशालेचे श्री. आचार्य यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका साटलकर, शिंदे आणि राऊत यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. यावेळी श्री. आठलेकर आणि सौ. साटम यांच्या कन्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. परब, श्री. नाईक, श्री. आठलेकर, सौ. साटम, सौ. शिंदे सौ. गावकर, सौ. गुळवे, श्री. खोत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.