-कचरा वर्गीकरणासाठी प्रभागनिहाय जनजागृती

-कचरा वर्गीकरणासाठी प्रभागनिहाय जनजागृती

२ (पान २ साठीमेन)


-ratchl१८४.jpg ः
२३M१६९६१
चिपळूण ः घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आयोजित बैठकीत माहिती देताना मुख्याधिकारी प्रसाद शिंगडे.
(छाया : महेंद्र कासेकर)
----------
कचरा वर्गीकरणासाठी प्रभागनिहाय जनजागृती

मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे ; नागरिकांची भूमिका महत्वाची

चिपळूण, ता. १८ ः चिपळूण पालिकेने शहरात संकलित होणाऱ्या ओल्या व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू केले आहे. या प्रक्रियेत शहरातील नागरिकांचाही सहयोग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले. शहरात या प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.
चिपळूण पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली घनकचरा व्यवस्थापनांतर्गत बैठक झाली. शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिंगटे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना ओला व सुका कचरा वर्गीकरणाची माहिती दिली. मात्र ही मोहीम शहर परिसरात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला स्थानिक नागरिकांच्या सहकार्याचीही गरज आहे. या संदर्भात शहरात जनजागृती करण्याची आवश्‍यकता असून त्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यापुढे नागरिकांनी घंटागाडीमध्ये कचरा वेगळा करून देण्याची गरज आहे. या संदर्भात शहरातील विविध वॉर्डमधून जनजागृतीसाठी बैठक घेतली जाणार आहे. जेणेकरून घरातील महिलांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, बापू साडविलकर, राजेंद्र खातू, निसर्गप्रेमी भाऊ काटदरे, बापू काणे, शिरीष काटकर, कांता चिपळूणकर, शाहनवाज शाह, समीर जानवलकर, सतीश कदम, महेंद्र कासेकर, सीमा रानडे, सीमा चाळके, स्मृती राणे, राजे प्रतिष्ठान आणि अनेक संस्थांचे सदस्य, नागरिक व नगर पालिकेचे अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-----
चौकट
कचऱ्यापासून खतनिर्मिती

गेल्या काही महिन्यांपासून चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. त्या अनुषंगाने ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जात असून तशा पद्धतीच्या घंटागाड्याही फिरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com