पोलिस दूरक्षेत्रांचे ''सीसीटीव्ही'' 
सदैव सुरू ठेवण्याची मागणी

पोलिस दूरक्षेत्रांचे ''सीसीटीव्ही'' सदैव सुरू ठेवण्याची मागणी

Published on

16991
सिंधुदुर्गनगरी ः पोलिस अधीक्षक अग्रवाल यांना निवेदन देताना ठाकरे गट पदाधिकारी.

पोलिस दूरक्षेत्रांचे ‘सीसीटीव्ही’
सदैव सुरू ठेवण्याची मागणी
सावंतवाडी, ता. १८ ः आंबोली, सातार्डा व आरोंदा पोलिस दूरक्षेत्रावर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बहुतेक वेळा बंद असल्याने गुन्हेगार जलद गतीने ताब्यात घेण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. कॅमेरे सदैव सुरू ठेवावेत, अशी मागणी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
आज ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी आजगाव येथील वेश्या व्यवसायप्रश्नी केलेल्या कारवाईसंदर्भात त्यांचे अभिनंदन केले. तालुक्यातील झाराप-पत्रादेवी महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट, इन्सुली, बांदासह आंबोली, सातार्डा व आरोंदा पोलिस दूरक्षेत्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे बऱ्याच वेळा बंद असल्यामुळे अपघात करून फरारी झालेला वाहनचालक मिळत नाही. असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, बाबुराव धुरी, मायकल डिसोजा, अजित सांगेलकर, सीताराम राऊळ आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.