नाबर स्कूलच्या तेली,
ओगले यांना शिष्यवृत्ती

नाबर स्कूलच्या तेली, ओगले यांना शिष्यवृत्ती

Published on

17003
बांदा ः नाबर शाळेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव करताना मुख्याध्यापिका मनाली देसाई. सोबत इतर शिक्षक.

व्ही.बी. नाबर स्कूलच्या
तेली, ओगले यांचे यश
बांदा, ता. १८ ः शिष्यवृत्ती परीक्षेत येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेच्या रत्नाकर ओगले आणि आराध्य तेली या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून शाळेचे नाव उंचावले आहे.
पाचवीच्या परीक्षेस ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून पाचवीचे १६,५३७ विद्यार्थी पात्र ठरले. ग्रामीण सर्वसाधारण विभागात तेली याने ६२वा आणि रत्नाकर ओगले याने ८४ वा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे चेअरमन मंगेश कामत यांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.