सोमय्यांविरोधात कणकवलीत घोषणाबाजी

सोमय्यांविरोधात कणकवलीत घोषणाबाजी

Published on

17016
कणकवली : येथील तहसील कार्यालयाबाहेर शिवसेना महिला आघाडीतर्फे किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला. यावेळी नीलम पालव, सुशांत नाईक, कन्हैया पारकर तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
(छायाचित्र : अनिकेत उचले)

सोमय्यांविरोधात कणकवलीत घोषणाबाजी

कथित व्हिडीओ प्रकरण; शिवसेना महिला आघाडीतर्फे आंदोलन

कणकवली, ता.१८ : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे आज कणकवलीत आंदोलन करण्यात आले. सोमय्या यांच्या प्रतिमेला महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून निषेध केला.
दरम्‍यान, सोमय्या यांना कपडे पाठविणार असल्‍याची माहिती महिला आघाडी जिल्‍हाध्यक्ष नीलम पालव यांनी दिली. हे कपडे प्रांताधिकाऱ्यांमार्फत पाठविण्याची विनंती त्‍यांनी केली होती; मात्र प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आपण केवळ निवेदन स्वीकारू शकतो. कपडे स्वीकारू शकत नसल्‍याचे स्पष्‍ट केले.
किरीट सोमय्या यांच्या कथित व्हीडिओ विरोधात आज शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसील कार्यालयासमोर महिला जिल्‍हाध्यक्ष नीलम पालव यांच्या नेतृत्‍वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘किरीट सोमय्याचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा घोषणा देत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर जोडे व लाथा मारून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, वैदही गुडेकर, दिव्या साळगावकर, संजना कोलते, धनश्री मेस्त्री, माधवी दळवी, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, राजू राठोड, महेश कोदे, मंगेश सावंत, विलास गुडेकर, सचिन राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
----
सोमय्यांना शर्ट, पँट पाठविणार
नीलम पालव म्‍हणाल्‍या, की भाजपचा हा नेता कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला अडचणीत आणण्यासाठी ईडी, सीबीआयकडे तक्रार करायचा; पण भ्रष्टाचार मुक्त देश झाला पाहिजे, असे सांगणाऱ्या सोमय्याचे कालपासून सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. स्वतःच अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या प्रवृत्तीचा आम्‍ही निषेध करत आहोत. पुढील काही दिवसांत आम्‍ही सोमय्याला ठाकरे शिवसेना महिला आघाडीतर्फे शर्ट व पँट पाठवणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.