माणगाव खोऱ्यात पावसाची संततधार

माणगाव खोऱ्यात पावसाची संततधार

Published on

माणगाव खोऱ्यात पावसाची संततधार
माणगाव ः माणगाव खोऱ्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. दुकानवाड पुलावर आज सकाळपासून उशिरापर्यंत पाणी असल्याने शिवापूर, आंजिवडे, वसोली, उपवडे या गावांचा संपर्क तुटला. दुकानवाड पुलाची कमी असल्यामुळे दिवभर रिपरिप पाऊस पडला तरी पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद होते. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत शिवापूर व वसोली सरपंचांनी संबंधित विभागाला निवेदनही दिले; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.
---
वादळी पावसाने देवगडला झोडपले
देवगड ः तालुक्याच्या किनारी भागाला वादळी पावसाने आज चांगलेच झोडपले. अधूनमधून वादळी वार्‍यासह जोराच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारनंतर पावसाची संततधार कायम होती. विश्रांतीनंतर पावसाचे पुन्हा दमदार पुनरागमन झाले आहे. किनारी भागात अधूनमधून वादळ सदृश वारा सुटतो. जोराच्या पावसाच्या सरी बरसल्या. दिवसभर आकाश काळवंडलेले होते. शाळा सुटताना पाऊस असल्याने आज विद्यार्थ्यांसह पालकांची तारांबळ उडाली. दिवसभर पाऊस पडत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.