तेरेखोल नदीला पूर

तेरेखोल नदीला पूर

17087
बांदा ः तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

17088
बांदा ः आळवाडी रस्त्यावर पाणी आले होते.

17089
बांदा ः निमजगा वाफोली रस्त्यावर आलेले पाणी. (छायाचित्रे ः नीलेश मोरजकर)


तेरेखोल नदीला पूर

धोका पातळी ओलांडली; नागरिक सतर्क

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. परिसरातील बहुतांश नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. तेरेखोल नदीला पूर आला असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आळवाडा परिसरातील व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बांदा-वाफोली मार्गावर निमजगा येथे गटाराचे पाणी तुंबून रस्त्यावर आल्याने याठिकाणी लोकांना तसेच वाहनचालकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती.
अद्यापपर्यंत पुराचे पाणी नदीच्या बाहेर आलेले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. तरीही पावसाचा रुद्रावतार पाहता धोका कायम आहे. शेर्ले येथील जुना कापई पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कापई भागातील ग्रामस्थही सतर्क झाले आहेत. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे व सहकारी पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. रात्री मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास याठिकाणी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बांदा-आळवाडी रस्त्यावर
सायंकाळी उशिरा पाणी आले होते.
--------------
17090
हडी ः येथील गणपत चव्हाण यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.

17091
आंबडोस ः येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले.

मालवणात तालुक्यात पडझड
मालवण, ता. १८ ः शहर परिसरास आज सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात पावसामुळे तालुक्यात वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हडी येथील गणपत नारायण चव्हाण यांच्या घरावर झाड पडल्याने १८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. आंबडोस-व्हाळवाडी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली. चिपीकडे जाणाऱ्या परुळे येथील रस्ता खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.
----------
17092
डिंगणे ः आंबेडकरनगरात कदम कुटुंबियांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.

घरावर झाड कोसळून
डिंगणे येथे नुकसान
बांदा, ता. १८ ः डिंगणे आंबेडकरनगर येथील रुक्मिणी विठ्ठल कदम व विजय विठ्ठल कदम यांच्या घरावर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास सागाचे झाड पडून नुकसान झाले. डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर यांनी मध्यरात्री तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. आज सकाळी बांदा तलाठी फिरोज खान यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी सरपंच संजय डिंगणेकर, ग्रामसेविका सुवर्णा वाघ उपस्थित होत्या. या घटनेत रुक्मिणी कदम व विजय कदम यांचे प्रत्येकी ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.
------------
फक्त फोटो
17093
वैभववाडी ः फोंडा मार्गावर झाड कोसळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com