विमा परताव्याच्या बहाण्याने 
वृध्दाला २७ लाखांचा गंडा

बहाण्याने वृध्दाला गंडा

विमा परताव्याच्या बहाण्याने वृध्दाला २७ लाखांचा गंडा बहाण्याने वृध्दाला गंडा

Published on

विमा परताव्याच्या बहाण्याने
वृद्धाला २७ लाखांचा गंडा
पुरळमध्ये प्रकार; ऑनलाइन फसवणूक
देवगड, ता. १८ : एका विमा कंपनीच्या पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, असा बहाणा करून तालुक्यातील पुरळ-कोठारवाडी येथील एका वयोवृद्धाची अज्ञाताकडून २७ लाख ३४ हजार ९२५ रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबतची तक्रार तालुक्यातील विजयदुर्ग पोलिस ठाण्यात नोंद आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२१ ते ८ जून २०२३ या मुदतीत घडला.
याबाबत विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक हेमंत देवरे यांनी सांगितले, की संशयिताने संबंधित वृद्धाला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून वेळोवेळी संदेश पाठवून, तसेच संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. वेळोवेळच्या संपर्कातून संबधित वृद्धाचे एका विमा कंपनीच्या पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, असे सांगून तोतयागिरी केली. यातून वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना सुमारे २७ लाख ३४ हजार ९२५ एवढ्या रकमेला गंडा घातला. यातून आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे संबंधित वृद्धाच्या लक्षात येताच त्यांनी विजयदुर्ग पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. येथील पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे तपास करीत आहेत. दरम्यान, अलीकडे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. फसवणूक करणारे विविध युक्त्या लढवत असल्याचे दिसून येत आहेत. ऑनलाइन खरेदीमध्येही फसवणूक होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.