मंडीतील आपत्तीचे तांडव अंगावर काटा आणणारे

मंडीतील आपत्तीचे तांडव अंगावर काटा आणणारे

Published on

१ (पान २ साठी, अॅंकर)


- rat१९p२१.jpg-
२३M१७१९५
हिमाचलप्रदेशमधील मंडी येथील व्यास नदीचे रौद्ररूप.
- rat१९p२३.jpg-
२३M१७१९३
चंदीगड बसस्थानकामध्ये बसलेले राकेश हर्डीकर, आकाश नाईक, प्रसाद शिगवण, पूजा शिगवण, नेहा घाणेकर.
----------

मंडीतील आपत्तीचे तांडव अंगावर काटा आणणारे

राकेश हर्डीकर ; २८ तास एकाच गाडीत ; लेह लडाखची बाईक सवारी अधुरी

राजेंद्र बाईत ; सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः मनाली-लेह-लडाख असा सुमारे साडसातशे किमीचा प्रवास बाईकवरून करण्याचे ध्येय उराशी बाळगून बाहेर पडलेल्या राजापूरमधील राकेश हर्डीकर आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांना तेथील महापुराचा सामना करावा लागला. मागील आठवड्यात अतिवृष्टी, महापtर, भूस्खलनसारख्या घटनांमुळे प्रकाशात आलेल्या हिमाचलप्रदेशमधील मंडी येथील ते चित्र हर्डीकर यांनी स्वतः पाहिले. व्यासनदीचे रौद्ररूप म्हणजेच महाप्रलयच वाटत होते. एकाच ठिकाणी तब्बल २८ तास एकाच गाडीत त्यांना राहावे लागले. रस्ते, पूल डोळ्यासमोरून वाहताना त्यांना पाहावे लागले. सुदैवाने, या परिस्थितीवर मात करत हर्डीकर आपल्या सहकाऱ्‍यांसह गावी परतले.
हिमाचलमध्ये मित्रांसह दुचाकीसवारीसाठी गेलेल्या रत्नागिरीतील राकेश हर्डीकर यांना व्यासनदीला आलेल्या पुराचा सामना करावा लागला. या परिस्थितीबाबत हर्डीकर म्हणाले, बाईकवरून मनाली-लेह-लडाख असा प्रवास करण्यासाठी आकाश नाईक, प्रसाद शिगवण, पूजा शिगवण, नेहा घाणेकर असे रत्नागिरीतून ७ जुलैला निघालो. ८ जुलैला चंदीगड मनालीला रात्री ९ वा. पोहोचलो. तिथून पुढे हिमाचल प्रदेश स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमधून प्रवास सुरू केला. बस पहाटेच्या दरम्यान मंडी शहरापासून पुढे सुमारे पाच किमी अंतरावर गेली आणि पुढील रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याचे समजले. आम्ही गाडी तिथेच थांबवली. या परिसरात जोरदार अतिवृष्टी सुरू झाली. मंडीतील रस्ते व्यास नदीच्या पुरात वाहून गेले. जसजशी आपत्कालीन स्थितीची माहिती मिळत गेली तशी मनातील उत्सुकतेची जागा भितीने घेतली. जिथे आमची बस थांबली होती तेथून ५० फुटावर रौद्ररूप धारण केलेली व्यासनदी वाहत होती. तिचे रूप अंगावर काटा आणणारे होते. माघारी फिरणेही मुश्किल होते. रस्ता मोकळा होऊन गाडी मार्गस्थ होईल या आशेने आम्ही बसमध्ये थांबलो. सुमारे २८ तास बसमध्येच मुक्काम केला. १० जुलैला सकाळी ७ वा. बस पुन्हा मंडी एसटी स्टॅन्डवर परतली. तेथून आम्ही चंदीगडला जाणारी बस पकडली. तेथेही नशीब आडवे आले. त्या मार्गावरही दरड कोसळली होती. दिल्ली, मथुरा परिसरातील पूरस्थितीच्या बातम्या कानावर आल्यानंतर आम्ही पुढे जाण्याचा प्लॅन रद्द केला.
--
चौकट
आणि आम्ही निःश्‍वास सोडला
माऊंट हनुमान तिब्बा हे शिखर सर करून अरविंद नवले हे लेह-लडाखला येणार होते; मात्र चार दिवस त्यांच्याशी संपर्कच होत नव्हता. अरविंद नेमके कुठे आणि कसे आहेत याची चिंता होती. त्यानंतर अरविंद यांच्याशी संपर्क झाला आणि आम्ही निःश्‍वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com