कुंभारखाणीत सायबर गुन्ह्यावर मार्गदर्शन
ra२०p८.jpg -
१७४५३
कुंभारखाणी बुद्रुकः महिला सक्षमीकरण कार्यक्रमात कोमल रहाटे यांचा सत्कार करताना गीता सुर्वे. शेजारी शलाका सुर्वे, राजश्री कदम, वंदना कदम आदी.
----------------
कुंभारखाणीत सायबर गुन्ह्यावर मार्गदर्शन
आरवलीः संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी प्रशाळेत महिला सक्षमीकरण व सायबर गुन्हे या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात महिला व विद्यार्थांनी सहभाग घेतला. संगमेश्वर येथील दुर्गाशक्ती महिला सक्षमीकरण संस्थेच्या कार्यकर्त्या कोमल रहाटे, कुंभारखाणी बुद्रुक सरपंच गीता सुर्वे, तंटामुक्ती समिती अध्यक्षा शलाका सुर्वे, समाजसेविका राजश्री कदम, वंदना सुर्वे यांनी महिला सक्षमीकरणविषयी महिलांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संगमेश्वर पोलिस ठाणेचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुरेश गावित, कांबळे यांनी सायबर गुन्हेगारीविषयी मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. या प्रसंगी राजेंद्र कदम, विकास सुर्वे, सरपंच गीता सुर्वे, उपसरपंच अनिल सुर्वे, कृष्णकांत सुर्वे, पोलिसपाटील राकेश सुर्वे, संजय साळवी व मुख्याध्यापक विलास जाधव उपस्थित होते.
-----------------
rat२०p९.jpg
१७४५४
देवरूख - येथील लायन्स क्लबच्या नवीन कार्यकारिणीतील सदस्य.
-------------
देवरूख लायन्स क्लबच्या
नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण
साडवलीः देवरूख लायन्स क्लबची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा सोमवारी देवरूख येथील पार्वती हॉटेल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी नूतन अध्यक्ष चेतन पाडळकर यांच्यासह नूतन पदाधिकारी व सदस्यांचे लायन्स क्लबच्या वरिष्ठांनी अभिनंदन केले. या वेळी जगदीश पुरोहित यांनी मार्गदर्शन केले. झोन चेअरमन श्रेया केळकर यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. या वेळी देवरूख लायन्स क्लबचे सदस्य, माजी जि. प. सदस्य सुरेश बने, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, पप्पू नाखरेकर, मुन्ना थरवळ, युयुत्सु आर्ते उपस्थित होते.
------------
rat२०p१.jpg
M१७४५८
काव्या चव्हाण
------------
शिष्यवृत्तीत काव्या चव्हाणचे यश
साखरपाः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या साखरपा पद्मा कन्या शाळेत पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावुन काव्या चव्हाण उत्तीर्ण झाली आहे. संगमेश्वर तालुकामधून १४ वी तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत ८८ वे स्थान मिळवले आहे. काव्याला पद्मा कन्याशाळेचे शिक्षक कांबळे व आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
------------
rat२०p२.jpg
१७४६४
साडवलीः देवरूख श्री गणेशवेदपाठशाळेत नामजप करण्यात आला.
---------
देवरुखातील श्री गणेशवेदपाठ शाळेत नामजप
साडवलीः श्रावण मास, अधिक मासानिमित्त देवरूख येथील श्री गणेशवेदपाठ शाळेत नामजप सुरू करण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत हा जप केला जात आहे. मंगळवारी पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद यांनी सिद्घ केलेला ॐ रामकृष्ण हरी हा मंत्र जपला गेला. वेदअध्यन करणाऱ्या मुलांसमवेत नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे. १८ तारखेपासून नामजप सुरू झाला आहे. मंगळवारी बुरंबाड येथील ध्रुवकांत मायदेव यांनी प्रसाद दिला.
--------
rat२०p१०.jpg
M17459
गुहागरः जीवनशिक्षण शाळा नं. १ येथे विद्यार्थ्यांचा सत्कार करताना लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरंडे, सचिव सचिन मुसळे, शामकांत खातू, सुरेश मर्दा व अन्य.
-----------
गुणवंतांचा गुहागर लायन्स क्लबतर्फे सत्कार
गुहागरः गुहागरमधील जीवन शिक्षण शाळा नं. १ मधील चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत तसेच एकूण १९ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या या यशाबद्दल लायन्स क्लब शाखा गुहागर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. लायन्स क्लब शाखा गुहागरतर्फे जीवनशिक्षण शाळा नं. १ व गुहागर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षक अमोल धुमाळ व शाळेतील शिक्षकवृंद यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी लायन्स क्लबतर्फे विद्यार्थांच्या बौद्धिक विकास होण्यासाठी आवश्यक उपक्रम राबवण्यात येणार असून, या विद्यार्थ्यांसाठी खास तज्ञ बोलावून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च लायन्स क्लब करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

