कुडावळे ग्रामस्थ मंडळातर्फे साहित्य वाटप

कुडावळे ग्रामस्थ मंडळातर्फे साहित्य वाटप

Published on

११ (पान २ साठी, संक्षिप्त)


-rat२५p८.jpg ः
२३M१८७१०
गावतळे ः ग्रामस्थ मंडळ कुडावळे (मुंबई) यांच्याकडून मुलांना शालेय साहित्य भेट देताना मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी.
-------------
कुडावळे ग्रामस्थ मंडळातर्फे शालेय साहित्य वाटप

गावतळे ः दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कुडावळे नं. १ शाळेतील पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेली अंशुल पाटील हिचा ग्रामस्थ मंडळ कुडावळे (मुंबई) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेतर्फे भेटवस्तू आणि शाळेचे पदवीधर शिक्षक गणेश पवार यांच्याकडून १५०० रुपये देऊन तिचा सन्मान करण्यात आला. ''शाळेला गावाचा आधार असावा'', या उक्तीप्रमाणे ग्रामस्थ मंडळाच्या सौजन्याने, कुडावळे गावातील सर्व शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षकांना छत्र्या व पेन देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कादिवली केंद्रप्रमुख धनंजय शिरसाट, महेश कदम उपस्थित होते.
--------------

-rat२५p१४.jpg ः
२३M१८७०२
साखरपा ः साक्षी कोरे हिचे अभिनंदन करताना पालक आणि शिक्षक.
-------------
साक्षी कोरे मागासवर्गीय विभागात तालुक्यात प्रथम

साखरपा ः येथील श्रीमान तुकाराम गणशेट गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी कोरे ही शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीनुसार साक्षी हिने मागासवर्गीय विभागात तालुक्यातून प्रथम येण्याचा तर जिल्ह्यातून पाचवी येण्याचा मान मिळवला आहे. तिच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका रंजन रेमणे, तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच प्रा. आबा सावंत, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, उपप्राचार्या शिल्पा वैद्य, संचालिका गीतांजली सावंत यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
----
देवरुखात शनिवारी श्रीनिवास पेंडसेंचे व्याख्यान

साडवली ः देवरूख येथील ज्योती महिला मंडळाच्या वतीने अधिक महिन्याचे महत्व या विषयी धामणी येथील श्रीनिवास पेंडसे यांचे व्याख्यान २९ जुलैला लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय येथे संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.